Migration History: सरस्वती खोरे सोडल्यानंतर ब्राह्मणांचे गट कोकण-गोव्यात, काश्मिरात स्थायिक झाले; सारस्वत, चित्पावनांचा इतिहास

Classification of Brahmins: भारतीय उपखंडात प्रवेश केल्यापासून त्यांच्या स्थलांतराचा इतिहास पाहता ब्राह्मण चार श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकतात.
Brahmin Migration History
Classification of BrahminsDainik Gomantak
Published on
Updated on

तेनसिंग रोद्रीगीश

ब्राम्हणांच्या अंतर्गत संघर्षाच्या कथा आपल्याला कोकणातील व गोव्यातील ब्राह्मणाच्या निर्मितीचे संकेत देतात. संघर्ष योग्य दृष्टिकोनातून मांडण्यासाठी आपण प्रथम ब्राह्मणाचे वर्गीकरण पुन्हा करणे आवश्यक आहे. पंचगौड विरुद्ध पंचद्रविड वर्गीकरण ऐतिहासिक तथ्यांवर आधारित नाही आणि म्हणूनच पूर्णपणे वास्तवनाही.

भारतीय उपखंडात प्रवेश केल्यापासून त्यांच्या स्थलांतराचा इतिहास पाहता ब्राह्मण चार श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकतात. पहिले विभाजन कदाचित ते सरस्वती खोरे सोडू लागले किंवा तिथे स्थायिक झाले तेव्हा झाले असावे. त्यातील एक गट कोकण, गोवा येथे स्थायिक झाला आणि दुसरा काश्मिरला गेला. उर्वरित पूर्वेकडे यमुना-गंगा दोआबमध्ये गेले; येथे त्यांनी क्षत्रियांची संस्कृती आणि जनुके दोन्ही आत्मसात केली; आपण त्यांना कुरु-पंचाल ब्राह्मण म्हटले आहे.

काही काळानंतर आणि बराच काळ लोटल्यानंतर, कुरु-पंचाल ब्राह्मण विंध्य नदीतून भारतीय द्वीपकल्पात स्थलांतरित झाले. येथे त्यांनी वडुकरांची संस्कृती आणि जनुके आत्मसात केली; आपण त्यांना दख्खनी ब्राह्मण म्हणू शकतो. आणि शेवटी ब्राह्मण तामिळकममध्ये स्थलांतरित झाले (नंतरचा मलबार किंवा सध्याचा केरळ); त्यांना आपण द्रविड ब्राह्मण म्हणू शकतो.

किनारी भाग आणि सह्याद्री ओलांडून दोन्ही प्रदेशांचा समावेश आहे असे बृहत्कोकणचा विचार केल्यास, आपण ब्राह्मणांना दोन मोठ्या श्रेणींमध्ये विभागू शकतो: समुद्रमार्गे प्रवेश करणारे आणि विंध्य ओलांडून प्रवेश करणारे. कोकणस्थ-देशस्थ हा फरक फक्त तोच दिसतो; परंतु प्रत्यक्षात तो नाही. कोकणस्थ ब्राह्मणांचा फक्त एक गट आहे: चित्पावन; त्यात सारस्वत समाविष्ट नाहीत.

देशावरून आलेल्या देशस्थ ब्राह्मणांत सर्व ब्राह्मणांचा समावेश आहे, परंतु कऱ्हाड्यांचा नाही. येथे निश्चितच काहीतरी चूक असावी. पंचगौड आणि पंचद्रविड अशी विभागणी पाहिल्यास चित्पावन(कोकणस्थ), देशस्थ आणि कऱ्हाडे हे परंपरेने पंचद्राविडांमध्ये येतात, तर सारस्वत हे पारंपारिकपणे पंचगौडांमध्ये समाविष्ट आहेत. (पांडुरंग वामन काणे, १९७४: हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, खंड २, १०३)

सह्याद्रिखंडामध्ये परशुराम यांनी कोकणची निर्मिती केली आणि त्यात चित्पावन, कऱ्हाडे आणि सारस्वत ब्राह्मण यांची वसाहत केल्याचे वर्णन केले आहे; परंतु सह्याद्रिखंडामधील पंचद्रविड यादीत चित्पावन, कऱ्हाडे किंवा पद्ये यांची नावे समाविष्ट नाहीत. जर आपण पद्यांना कऱ्हाडे गटात समाविष्ट केले तर याचा अर्थ असा होतो की सह्याद्रिखंड चित्पावन आणि कऱ्हाडे यांना पंचद्रविड यादीतून बाहेर ठेवतो.

याचा अर्थ चित्पावन आणि कऱ्हाडे हे सारस्वतांप्रमाणे पंचगौड असण्याची शक्यता निर्माण होते. खरे तर, चित्पावन पंचद्रविड गटातील आहेत, असे आपण मानण्याचे कोणतेही कारण नाही. सारस्वतांना कुठून आणले याचे स्पष्ट उल्लेख सह्याद्रिखंडात आहेत.

पण, चित्पावन कुठून आले, याबाबत मात्र संदिग्धता आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की, ते त्याच ठिकाणाहून आणले गेले नसतील. सह्याद्रिखंडात सारस्वतांप्रमाणेच कऱ्हाड्यांच्या वंशाचा (गोत्र) स्पष्टपणे उल्लेख आहे. म्हणून सह्याद्रिखंड असे गृहीत धरतो की ते देखील त्याच ठिकाणाहून आले असावेत, अशी शक्यता आहे.

समुद्रमार्गे आलेले आणि विंध्य ओलांडून आलेले. चित्पावन, कऱ्हाडे आणि सारस्वत हे सर्व समुद्रमार्गे आलेले तर देशस्थ ब्राह्मण विंध्य ओलांडून आलेले. या दोन वर्गांमधील पंचगौड-पंचद्रविड विभाग यांच्यातील संबंध सरळ आहे. यमुना-गंगा दोआबमध्ये जाण्यापूर्वी पंचगौड गट सोडून गेलेले ब्राह्मण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले आणि तिथेच स्थायिक झाले; ते सांस्कृतिक आणि अनुवांशिकदृष्ट्या पंचगौड राहिले. यमुना-गंगा दोआबमध्ये गेलेल्यांपैकी काही जण दख्खन आणि अखेर तामिळकममध्ये गेले; यातून त्यांची गणना पंचद्रविडांमध्ये झाली.

आम्हांला चित्पावन आणि सारस्वत यांच्याशी फारशी अडचण नाही; आम्ही आधीच सांगितले आहे की सारस्वतांचे स्थलांतरण कदाचित सरस्वती खोऱ्यातून समुद्रमार्गे कोकण किनाऱ्यावर झाले; आणि हे मत बहुतेक निर्विवाद आहे. चित्पावन कोकण किनाऱ्यावर कुठून आले, याच्या तीन शक्यता आहेत. पहिली शक्यता ते त्यांच्या जन्मस्थानातून म्हणजे चिपळूण येथून आले असावेत.

दुसरी शक्यता म्हणजे सह्याद्रिखंडात वर्णिलेली कथा. परशुरामांनी समुद्रातून नव्याने निर्माण केलेल्या भूमीत एकही ब्राह्मण सापडला नाही. त्यांनी सर्व ब्राह्मणांना श्राद्ध करण्यासाठी आमंत्रित केले; कोणीही आले नाही. संतप्त परशुरामांनी नवीन ब्राह्मण निर्माण करण्याचा निर्णय घेतला. समुद्राच्या काठावर भटकत असताना, त्यांनी काही लोकांना चितेभोवती जमलेले पाहिले आणि त्यांना त्यांच्या जाती आणि धर्माबद्दल विचारले.

Brahmin Migration History
Goa History: गोव्याचे सुपुत्र 'रामचंद्रबाबांच्या' सूचनेवरून बाजीराव पेशव्यांनी मंदिरांना गावे इनाम दिली होती; अंत्रुजमहाल सनदीचा इतिहास

हे मच्छीमार होते आणि परशुरामाने त्यांच्या साठ कुटुंबांना शुद्ध केले आणि त्यांना ब्राह्मणत्व बहाल केले. या मच्छिमारांना अंत्यसंस्काराच्या ठिकाणी (चित्ता) शुद्ध करण्यात आले होते, म्हणून त्यांना चित्पावन हे संबोधन मिळाले. (संदर्भ : सह्याद्रिखंड २.१.३१; (कुन्हा आवृत्ती) ३०३) या दंतकथेची ऐतिहासिकता गौण आहे.

परंतु ती चित्पावनांचा समुद्राशी असलेला संबंध दर्शवते, किंवा त्याऐवजी, ते समुद्रातून त्यांचे आगमन सूचित करते. तिसरी शक्यता म्हणजे शतप्रश्नकल्पलतिकामधील कथा. ही कथा समुद्राच्या प्रवासात चित्पावन वाहून गेल्याबद्दल आहे. हे निश्चितपणे परदेशी व्यापाऱ्यांशी संबंध सूचित करते, ज्यामुळे चित्पावनाच्या किनारी भागाशी संबंध असण्याच्या गृहीतकाला बळकटी मिळते. दुर्दैवाने, कऱ्हाड्यांचा समुद्राशी असलेला संबंध सिद्ध करण्यासाठी अशी कोणतीही कथा नाही. जोपर्यंत आपल्याला पुरेसे पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्यांना दख्खन ब्राह्मण क्षेत्रात परत आणावे लागेल.

Brahmin Migration History
Migration History: सरस्वती नदी आटल्यावर सारस्वत ब्राह्मण कोकणात, गोव्यात स्थायिक झाले; स्थलांतराचा इतिहास

पण यात आहार ही एक मोठी अडचण आहे. सारस्वत हे मासे आणि मांस खाणारे आहेत, तर चित्पावन शाकाहारी आहेत. जर दोघेही कमी-अधिक प्रमाणात पूर्वाश्रमीच्या एकाच भूभागातले, किनाऱ्याशी संबंध असलेले आणि स्थलांतरादरम्यान एकसमान परिस्थिती असलेले आहेत, तर मग आहारात फरक कसा आला?

तसेच, जर सारस्वत आणि कऱ्हाडे यांची वंशावळ समान असेल, तर आहारात फरक कसा आला? त्यांच्या पूर्वाश्रमीच्या भूमीपासून वेगळे होण्याचा काळ भिन्न असावा किंवा पर्यायीपणे, कोकण किनाऱ्यावर त्यांच्या येण्याच्या कालखंडात फरक असावा. या दोन्ही शक्यता धूसर वाटतात. आहारातील फरकाचे कारण वेगवेगळ्या कालखंडाशी नसून ब्राह्मणांचा जैन संस्कृतीशी संपर्क आल्यामुळे फरक पडला असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com