Rangmel Repertory: कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर 'रंगमेळ'चे काय झाले?

Kala Academy Rangmel Repertory: कलाकार समाजाला घडवत असतात. जर त्यांनी चित्राच्या माध्यमातून दैवी आकृत्या साकारल्या नसत्या तर आज जगात पूजेसाठी मूर्ती आणि प्रतिमा नसत्या.
Kala Academy Rangmel repertory artists
Kala Academy RangmelDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षा शिरोडकर

कलाकार समाजाला घडवत असतात. जर त्यांनी चित्राच्या माध्यमातून दैवी आकृत्या साकारल्या नसत्या तर आज जगात पूजेसाठी मूर्ती आणि प्रतिमा नसत्या. एक कलाकार यांनी मला अधिकाऱ्यांना सांगावेसे वाटते की त्यांनी संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे लक्ष द्यायला हवे.‌ हे केवळ एका इमारतीबद्दल नाही तर गोव्याच्या सांस्कृतिक वारशात योगदान देणाऱ्या दूरदर्शी कलाकारांबद्दल आहे.

मी कला अकादमीच्या नाट्य शाळेची तसेच त्यानंतर राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची (एनएसडी) माजी विद्यार्थिनी राहीली आहे. सध्या कला अकादमीचा कारभार ज्या पद्धतीने चालू आहे त्यातून कला अकादमीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर काही गंभीर प्रश्न मला उपस्थित करावेसे वाटतात. तीन वर्षांच्या नूतनीकरण कालावधीनंतर डिसेंबर 2023 मध्ये कला अकादमीचे पुन्हा उद्घाटन करण्यात आले.

नूतनीकरणादरम्यान कला अकादमीचे नाट्य महाविद्यालय- त्याचे कर्मचारी विद्यार्थी आणि ग्रंथालयासह फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिर मध्ये स्थलांतरित करण्यात आले तर कला अकादमीच्या इतर प्रशासनिक कर्मचाऱ्यांना पणजी येथील आदिलशहा पॅलेसमध्ये हलवण्यात आले. मात्र कला अकादमीच्या 'रंगमेळ' या नाट्य रिपर्टरी  कंपनीचे आणि त्यांच्या कलाकारांचे काय झाले हे मात्र गुलदस्त्यात राहिले.

 तालमीच्या जागेचा अभाव या सबबीखाली नाट्य रिपर्टरी कंपनी निलंबितच करण्यात आली. खरे तर मिनेझिस ब्रागांझा हॉल, ईएसजीची जागा किंवा राजीव गांधी कला मंदिर हे पर्याय त्यासाठी उपलब्ध होते- अगदी कला आणि संस्कृती संचालनालयाच्या जागेतही रिपर्टरी कंपनीची व्यवस्था होऊ शकली असती. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिपर्टरी कंपनी अस्तित्वात नसताना देखील रिपर्टरी इन्चार्ज, स्कूल ऑफ ड्रामा इन्चार्ज वॉर्डरोब इन्चार्ज आणि इतर संबंधित पदे अद्याप अधिकृतपणे कागदावर अस्तित्वात आहेत आणि त्यांचा पगारही वितरित केला जात आहे.

Kala Academy Rangmel repertory artists
Kala Academy: लतादीदींनी झाकीर हुसेन यांना भेट दिलेली हिऱ्याची अंगठी, ते कपडे वाळत घातलेला 'कला अकादमी'चा खुला रंगमंच

कला अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आणि चॅट जीपीटीद्वारे मिळवलेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्यांची नावे अद्याप सूचीबद्ध आहेत.‌ रिपर्टरी कंपनीच्या गैरव्यवस्थापनाची किंवा कामकाजासाठी वाटप करण्यात येत असलेल्या सरकारी निधीच्या संभाव्य गैरवापरासंबंधी चिंता व्यक्त करणे हे इथे अजिबात गैरलागू होणार नाही. या कला अकादमीत सुशांत नायक नामक एक व्यक्ती एकाच वेळी अनेक प्रमुख पदे भूषवताना दिसते. ही व्यक्ती राजीव गांधी कला मंदिरची थिएटर इन्चार्ज आहे, हिच व्यक्ती कला अकादमीच्या नाट्यगृहाची अतिरिक्त इन्चार्ज आहे त्याशिवाय कला अकादमीच्या रिपर्टरी कंपनीची तसेच नाट्य विद्यालयची देखील इन्चार्ज आहे. 

Kala Academy Rangmel repertory artists
Kala Academy: एक नया पैसा न देता 'कला अकादमी'ची दुरुस्ती करणार, कंत्राटदार 'ब्लॅकलिस्ट'मध्ये; मुख्‍यमंत्री ॲक्शन मोडवर

कला अकादमीच्या वेगवेगळ्या विभागांसाठी वाटप केलेला निधी खऱ्या अर्थाने त्याच कारणासाठी वापरला जात असतो का? हा निधी कोठे जात आहे यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कुणाकडे दिली गेली आहे का? कला अकादमीचे नूतनीकरण होण्यास सुरू झाल्यापासून 'रंगमेळ' सांस्कृतिक परिदृश्यातून गायब झाले आहे.‌ जर ते अस्तित्वात नसेल तर हे अधिकारी कशासाठी नियुक्त केले गेले आहेत? 'रंगमेळ' कागदावर तरी अस्तित्वात का आहे?  रंगमेळ पुनर्जीवित करणे अशासाठी महत्त्वाचे आहे की त्यात गोव्यातील 15 ते 20 कलाकारांची भरती होऊन त्यातून चांगल्या नाट काची निर्मिती होऊ शकेल आणि स्थानिक नाट्य कलाकारांच्या गुणांना चालनाही मिळू शकेल. रंगमेळ गायब करून एक महत्त्वाची सांस्कृतिक परंपराच कला अकादमीने खंडित केली गेली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com