Shri Saptakoteshwar: शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या ‘सप्तकोटीश्वर’चा इतिहास उलगडणार, पर्यटन खात्याकडून चित्रपटाची निर्मिती

Saptakoteshwar Temple Movie: शिवकालीन इतिहास असलेल्या आणि शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या नार्वे येथील सप्तकोटीश्वर मंदिरातील ऐतिहासिक घडामोडींवर आता चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.
Film on Saptakoteshwar temple history
Film on Saptakoteshwar temple historyDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शिवकालीन इतिहास असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिरातील ऐतिहासिक घडामोडींवर आता चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. पर्यटन खात्यातर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून आज श्री सप्तकोटीश्वर मंदिरात चित्रीकरणही करण्यात आले.

या चित्रपटात छत्रपती शिवरायांचे आगमन, दिवाडी बेटावरून नार्वेला स्थलांतरीत केलेले शिवलींग श्री सप्तकोटीश्वर मंदिराची पुनर्बांधणी आणि आदी ऐतिहासिक घटनांचा समावेश असणार आहे.

या प्रसंगांचे चित्रीकरण करण्यासाठी दिल्लीहून दिग्दर्शक खरबंदा आणि अभिनेता क्रांती झा यांच्यासह अन्य कलाकार मिळून २० जणांची टीम आज नार्वे येथे श्री सप्तकोटीश्वर मंदिरात दाखल झाली. या कलाकारांनी चित्रीकरणही केले. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीचे मुखत्यार विजय सरदेसाई, सचिव मंदार सरदेसाई आणि इतिहास अभ्यासक संजीव सरदेसाई उपस्थित होते.

Film on Saptakoteshwar temple history
Ancient Ram Mandir: छत्रपती संभाजीराजांच्या शोधात आला मुघल सम्राट, उद्ध्वस्त केले गोव्यातील राम मंदिर, 1985 साली सापडले अवशेष

१५४७ साली नरसिंह सरदेसाई यांनी दिवाडी बेटावरून शिवलिंग नार्वे येथे आणले. नंतर १५४९ साली नार्वे येथे छोटेशे मंदिर उभारण्यात आले.

Film on Saptakoteshwar temple history
Goa Shack Policy: शॅक्सच्या ‘सबलेटिंग’ प्रकरणांचा पुनर्विचार होणार! मंत्री खंवटेंनी दिली माहिती; 23 परवान्यांचे होणार नूतनीकरण

११ शिवलिंग

सप्तकोटीश्वर मंदिरासह राज्यातील ११ शिवलिंग असलेल्या मंदिरांचा इतिहासही चित्रपटात दाखविणार आहेत. शिवलिंगांचे पर्यटनदृष्ट्या अध्यात्मिक महत्व व शिवजयंतीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पर्यटन खात्यातर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com