Shefali Jariwala: काय आहे शेफालीची 'ती' शेवटची इच्छा? 'कांटा लगा' फेम अभिनेत्रीने स्वतः सांगितलं होतं "मला कायम..."

Shefali Jariwala Last Wish: शेफालीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात तिने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती
Shefali Jariwala news
Shefali Jariwala newsDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: अभिनेत्री आणि बिग बॉस १३ स्पर्धक शेफाली जरीवाला हिच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. या धक्कादायक बातमीदरम्यान, शेफालीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात तिने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती.

'कांटा लगा गर्ल' म्हणूनच कायम स्मरणात राहण्याची इच्छा

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ १० महिन्यांपूर्वीच्या एका पॉडकास्ट मुलाखतीचा आहे. ज्यात शेफाली आपल्या 'बिग बॉस १३' मधील सह-स्पर्धक पारस छाबरा सोबत संवाद साधत आहे. या मुलाखतीत शेफालीने सांगितले होते की, 'एक कलाकार म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते; कोणीही 'अँग्री यंग मॅन' किंवा 'किंग खान' प्रयत्नांशिवाय बनत नाही.'

Shefali Jariwala news
Shefali Jariwala: ''लवकर वर ये'' मृत्यूआधी शेफालीचा नवऱ्याला शेवटचा फोन; पल्स सुरु होती, पण...

हसत हसत शेफाली पुढे म्हणाली होती, "जगात फक्त एकच 'कांटा लगा गर्ल' असू शकते आणि ती मी आहे, आणि मला हे नाव खूप आवडते. जोपर्यंत मी जिवंत आहे आणि माझ्या मृत्यूनंतरही लोकांनी मला याच नावाने लक्षात ठेवावे, अशी माझी इच्छा आहे." शेफालीच्या निधनानंतर हा व्हिडिओ समोर आल्याने तिचे चाहते खूपच भावूक झाले आहेत. तिच्या या इच्छेमुळे चाहत्यांच्या भावनांना पाझर फुटला आहे.

'कांटा लगा' ते 'बिग बॉस १३' पर्यंतचा प्रवास

शेफाली जरीवालाला २००२ साली आलेल्या 'कांटा लगा' या सुपरहिट रिमिक्स गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. या गाण्याने तिला घराघरात पोहोचवले आणि तिला 'कांटा लगा गर्ल' म्हणून नवी ओळख दिली. त्यानंतर तिने सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या मुझसे शादी करोगी या चित्रपटातही काम केले. २०१९ मध्ये ती 'बिग बॉस १३' मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती, जिथे तिने आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि खेळामुळे प्रेक्षकांची मने जिंकली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com