IFFI: 'इफ्फीसाठी गोव्यात येणे म्हणजे नवीन शिकण्याजोगे'! प्रसिद्ध दिग्दर्शक अलींचे गौरवोद्गार; सिनेमात जग बदलण्याची क्षमता असल्याचे मांडले मत

Shaad Muzaffar Ali IFFI Goa: कला अकादमी येथे आयोजित सिनेमा आणि संस्कृतीचे दोन पिढ्यांतील प्रतिबिंब या विषयावर अली बोलत होते. त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याचे सुपुत्र शाद अली यांनी त्यांना बोलते केले.
Shaad Muzaffar Ali IFFI Goa
Shaad Muzaffar Ali IFFI GoaDainik Gomantak
Published on
Updated on

प्रत्येक तरूणाचे स्वप्न असते की त्याने इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करावे, सर्व जगाने त्याला ओळखावे तिच स्थिती युवावस्थेत माझी होती. कधी शायरी केली, चित्रांच्या दुनियेत रंगलो, परंतु शेवटी चित्रनगरीत प्रवेश केला. माझ्यासाठी चित्रपट ही पाहण्याची नव्हे तर अनुभवाची, व्यक्त होण्याची गोष्ट आहे. सिनेमात जग बदलण्याची क्षमता असल्याचे मत प्रख्यात दिग्दर्शक मुझफ्फर अली यांनी व्यक्त केले.

कला अकादमी येथे आयोजित सिनेमा आणि संस्कृतीचे दोन पिढ्यांतील प्रतिबिंब या विषयावर अली बोलत होते. त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याचे सुपुत्र शाद अली यांनी त्यांना बोलते केले. मुझफ्फर अली म्हणाले, सिनेमाविषयी जाण येण्यास मला सुमारे दहा वर्षे लागली.

सत्यजित रे सारख्यांचे दिग्दर्शन मी जवळून पाहिले आणि स्थलांतर या विषयावरील गमन हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला ज्याला सातव्या इफ्फीमध्ये रजत मयुर प्राप्त झाला होता. उमराव जान सिनेमा तर सर्वांना ठाऊक आहे. या सिनेमातील संगीत काव्यात्मक आहे. त्यात तत्वज्ञान, दुःख, अपेक्षेहून मोठी स्वप्ने पाहण्यास ते प्रवृत्त करते. संगीताच्या बाबतीत मी संगीत दिग्दर्शकांना मोकळीक दिल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

Shaad Muzaffar Ali IFFI Goa
Manoj Bajpayee at IFFI: ‘..श्रीकांत तिवारी इज कमिंग’! इफ्फीत ‘द फॅमिली मॅन’चा खास शो; मनोज वाजपेयीची धाकड एन्ट्री

‘झूनी’ अर्धवट सिनेमा पूर्ण होणार

झूनी हा हब्बा खातून यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होता जो काश्मीरमधील तत्कालीन चित्रकरणाला झालेला त्रास, धमक्या आदींमुळे बंद करावा लागला होता. या चित्रपटासाठी मी घर सोडून काश्मीरमध्ये राहत होतो. माझे सर्वस्व या चित्रपटासाठी दिले होते. परंतु आता हा चित्रपट शाद अली मुळे पूर्ण होत असून जुन्या आणि नव्याचा मिलाफ यातून दिसणार असल्याचे समाधान असल्याचे मुझफ्फर अली यांनी सांगितले.

Shaad Muzaffar Ali IFFI Goa
IFFI 2025: 'इफ्फी'च्या कार्यक्रमस्थळी गोमंतकीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार दिसायला हवे होते; परंतु चित्र मात्र अगदीच वेगळे..

इफ्फीसाठी गोव्यात येणे म्हणजे नवीन काहीतरी शिकण्याजोगे आहे. आम्ही भारतात कोणत्या प्रकारचे चित्रपट प्रदर्शित करतो जागतिक स्तरावर काय चालले आहे याची माहिती मिळते. इफ्फी हे दिग्दर्शक, कलाकारांसाठी अनेक गोष्टी शिकवत असते, असे मुझफ्फर अली यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com