
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक असलेल्या रश्मिका मंदान्ना आणि विजय देवराकोंडायांनी अखेर त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधाला अधिकृत रूप दिल्याचे वृत्त आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी शुक्रवारी (३ ऑक्टोबर) कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका खासगी समारंभात साखरपुडा उरकलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने अत्यंत खासगी पद्धतीने साखरपुडा केला. दोन्ही कलाकारांनी अजून अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही, मात्र आता फेब्रुवारी २०२६ मध्ये ते विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. या वृत्तामुळे 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिका आणि विजयच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या साखरपुड्याच्या चर्चांना रश्मिकाच्या एका व्हायरल सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक बळ मिळाले होते. दसऱ्याच्या निमित्ताने रश्मिकाने पारंपरिक वेशात कपाळावर टिळा लावलेला एक सुंदर फोटो शेअर केला होता.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने आपल्या आगामी चित्रपट 'थम्मा' च्या ट्रेलर आणि गाण्यावर चाहत्यांनी केलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. या पोस्टनंतर चाहत्यांनी तिचे अभिनंदन करत 'साखरपुडा' झाल्याचे तर्क लावले होते, ज्याला आता खासगी सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
व्यावसायिक आघाडीवर, रश्मिका मंदान्ना लवकरच दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या हॉरर-कॉमेडी चित्रपट 'थम्मा' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. 'थम्मा' चित्रपट २१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.