
महावतार नरसिंह या अॅनिमेटेड पौराणिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले असून, भारतासह परदेशातही तिकीट खिडकीवर दमदार कमाई सुरू आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या १७ दिवसांत २१३ कोटी रुपयांचा जागतिक गल्ला जमवला आहे.
यासह २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. सध्या तो छावा, L2: एंपुरान, संक्रांतीकि वस्थुनम्, आणि थुदारुम या चित्रपटांमागे आहे.
महावतार नरसिंह हा अॅनिमेटेड चित्रपट असून, त्यात प्रचंड प्रमाणावर VFX आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हा चित्रपट भारतीय अॅनिमेशनला नवी ओळख देईल आणि जागतिक पातळीवरील स्पर्धा करेल.विशेष म्हणजे, या दर्जेदार निर्मितीचा बजेट केवळ १० ते १५ कोटी रुपयांदरम्यान आहे.
१० ऑगस्ट रोजी (तिसऱ्या रविवारी) चित्रपटाने तब्बल २३.५ कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्क*नुसार, भारतात आतापर्यंत *१६९.६५ कोटी, तर एकूण जागतिक कमाई २१३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम भाषांत प्रदर्शित झाला असून, सर्वाधिक कमाई हिंदी व तेलुगू भाषांमध्ये झाली आहे.
चित्रपटाने केवळ ३ दिवसांत उत्पादन खर्च वसूल केला आहे. पहिल्या रविवारी (तिसऱ्या दिवशी) ९ कोटी, पहिल्या दिवशी १.७५ कोटी, आणि दुसऱ्या दिवशी ४.६ कोटींची कमाई झाली.
महावतार नरसिंह हा निःसंशयपणे एक सुपरहिट चित्रपट ठरला आहे. केवळ कमाईच नव्हे, तर फिल्म्सच्या 'महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स' मधील हा पहिला टप्पा यशस्वी ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.