Konkani Drama Competition: डॅडी, सकारात्मक दृष्टिकोनाचे वेधक चित्रण; नाट्यसमीक्षा

Daddy Play Review: नाट्यगृह फुल्ल झाल्यानंतर नाट्यप्रयोगाला कशी रंगत येते, याचा प्रत्यय ‘अंत्रुज घुडयो’ संस्थेने सादर केलेल्या ‘डॅडी’ या नाटकाने दिला.
Daddy Play Review
Konkani Drama CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नाट्यगृह फुल्ल झाल्यानंतर नाट्यप्रयोगाला कशी रंगत येते, याचा प्रत्यय ‘अंत्रुज घुडयो’ संस्थेने सादर केलेल्या ‘डॅडी’ या नाटकाने दिला. तसे पाहायला गेल्यास हे नाटक स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून लोकांच्या ओठावर होते. त्यामुळेच या नाटकाला गर्दी होणार, हे अपेक्षित होते. तसे हे नाटक नवे नाही; पण आजही या नाटकातील मूल्ये मनाला भावतात.

माणसात आत्मविश्वास निर्माण झाला तर तो काहीही मिळवू शकतो, हा या नाटकाचा संदेश. या नाटकात मोठा संघर्ष आहे, असे नाही; पण भावनांचा कल्लोळ, नात्यांना चिकटलेले कंगोरे, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन याचे वेधक चित्रण केल्यामुळे ते मनाला भिडते.

दत्ताराम कामत बांबोळकर यांची ही संहिता डॅडी, मम्मी आणि त्यांची आठ मुले (नंतर जन्माला येते ते धरून नऊ) यांच्याभोवती फिरते. डॅडी म्हणजे तसा करारी माणूस, आपल्या मुलांत आत्मविश्वास आणण्याकरिता धडपडणारा. त्याला कुटुंब नियोजन मान्य नाही.

म्हणूनच तो आठ मुलांना जन्माला घालतो. नंतर नाटक सुरू असताना नववे मूल जन्माला येते. या आठ मुलांचे आणि त्यांच्या डॅडी- मम्मीचे लागेबांधे या नाटकात प्रभावीपणे साकारले आहेत. आपल्या लहान मुलीला कंपाऊंडला रंग मारायला सांगणारा, जन्माला आलेल्या मुलीला टब बाथमध्ये आंघोळ घालू पाहणारा हा डॅडी थोडा विक्षिप्त वाटत असला तरी त्यामागे त्याच्या वेगळ्याच भावना असतात.

तो मुलांत आत्मविश्वास निर्माण करू पाहतो. या करता कधी कधी त्याच्यात व बायकोत संघर्षही होतो. पण त्यामागची त्याची खरी भावना कळल्यावर ती माघार घेते. वेळेचे नियोजन करून वेळ वाचविण्याकरता तो अनेक प्रयोग करतो. त्यामुळे हा डॅडी म्हणजे एक वेगळ्या प्रकारचे रसायन असल्याचे दिसून येते. यातूनच हे नाट्य फुलत जाते.

नंतर अचानक होणारा डॅडीचा मृत्यु मात्र खटकतो. तो आपल्याला १२ वर्षे हृदयविकाराचे दुखणे आहे, असे सांगत असला तरी त्याचे नाटकात कोठेही दर्शन होत नाही. डॅडी जेव्हा ओरडतो, तेव्हा त्याला धाप लागल्याचे वा अस्वस्थता दाखविली असती तर नंतरचा मृत्यू जास्त परिणामकारक वाटला असता. यात पायलट अंकल नावाचे जे पात्र आहे, तेसुद्धा मनाला भिडते. जेव्हा सगळी आठ मुले एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या मुव्हमेंटस चांगल्या प्रकारे घेतल्या.

नेपथ्याच्या एका कोपऱ्यात डॅडींची खुर्ची दाखवून योग्य वातावरण निर्मिती केली. नाटकात खूप लहान मुले असल्यामुळे त्यांना नियंत्रणात ठेवणे, ही देखील कलाच आहे. यातही बांबोळकर यशस्वी ठरले. डॅडीची भूमिका सुरेल तिळवे यांनी प्रभावीपणे केली.

Daddy Play Review
Konkani Proverbs: "करूंक हांव, न्हेसूंक तूं" या कोकणी म्हणीचा अर्थ काय ?

मम्मी झालेल्या खुशबू कवळेकर यांनी तिळवे यांना योग्य साथ दिली. भावनाप्रधान प्रसंगात त्या उठून दिसल्या. पायलट अंकलच्या छोट्या भूमिकेत स्वप्निल तारी भाव खाऊन गेले. मुले आपल्याला कशी छळतात, हे सांगणाऱ्या प्रसंगात तर त्यांची संवादफेक व मुद्राभिनय वाखाणण्यासारखा होता. ‘दुर्मिग पाय’च्या भूमिकेत गुरुदास नायक शोभले; पण काही ठिकाणी त्यांची ओव्हर ॲक्टिंग खटकत होती. खरी दाद द्यावी लागेल ती बच्चे मंडळींना.

त्यांनीच हे नाटक उचलून धरले. लता झालेली मुस्कान कामत, शबाना झालेली श्रीनिका नायक, जेन झालेली मैत्री सावंत, स्टेफी झालेली धन्वी तामसे, अझर झालेला श्रेयस भट्ट, सचिन झालेला आर्चीस कवळेकर, दीप झालेला शर्व नायक यांनी मजा आणली. यात सर्वाधिक उल्लेख करावा लागेल तो सर्वांत लहान सलीमच्या भूमिकेतील दिव्यांक कामतचा. त्याच्या चटपटी भूमिकेला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

Daddy Play Review
Konkani Drama Competition: लावां भुतां, शापित घराची कहाणी सांगणारे नाट्य; नाट्यसमीक्षा

बालचमूंचे एकमेकांशी ट्युनिंग इतके परफेक्ट होते की त्यामुळे नाटकाचा आलेख विस्तारला. मोहित विश्वकर्मा यांचे नेपथ्यही दाद देण्यासारखे होते. त्यांच्या नेपथ्यामुळे नाटकाला वेगळाच गेट अप प्राप्त झाला. प्रसन्ना कामत यांच्या समयोचित पार्श्वसंगीतामुळे प्रसंगाची परिणामकारकता वाढली. सदानंद वळवईकर यांची प्रकाश योजना नाट्यप्रयोगाला पूरक अशी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com