Akshata Chhatre
एखाद्या भाषेची खासियत म्हणजे त्या भाषेतील म्हणी. अनेकवेळा तुम्ही म्हणींचा वापर करताना पाहिलं असेल, म्हणीच खरंतर भाषेची संपन्नता वाढवतात.
गोव्यात कोकणी भाषा बोलली जाते. शाळेत देखील कोकणी ही भाषा शिकवली जाते. जसजशी जागा बदलते तशी तिथली कोकणी सुद्धा बदलत जाते.
गोव्यातील घरांमध्ये कोकणी भाषेतील म्हणींचा भरपूर वापर होतो. एखादा मुद्दा मांडण्यासाठी म्हणींचा वापर होतो.
याचा शब्दशः अर्थ करायला मी आणि नेसायला तू असा होतो. मात्र आज आपण याचा खरोखर अर्थ जाणून घेणार आहोत.
या म्हणायचं अर्थ असा की एखादं काम करावं भलत्याने, मात्र त्यावर मिरवणार कोणी भलतंच.
सोप्या शब्दांत सांगायचं तर कोणी भलत्यानेच केलेल्या कष्टांचं आपण क्रेडिट घेणं. आपण काहीही काम केलेलं नसताना केवळ दुसऱ्यांच्या मेहनीतीवर फळ उपभोगणं.
तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यसे अनुभव घेतलेच असतील, आता ही म्हण वापरून सुद्धा बघा.