
Katrina Kaif baby bump photo: गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या दोघांनीही आपल्या चाहत्यांना ही ‘गोड बातमी’ दिली असून, त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चाहते आणि बॉलिवूडमधील त्यांचे मित्र-मैत्रिणी आनंदित झाले आहेत.
२०२१ मध्ये राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या लोकप्रिय जोडीने आज आपल्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात जाहीर केली आहे. त्यांच्या लग्नाला आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत आणि येत्या काही दिवसांत ते आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.
आपल्या बाळाची चाहूल लागल्याची बातमी देताना,कतरिना आणि विकी यांनी सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. हा एक पोलरॉइड शॉट असून, त्यात कतरिना बेबी बंपसह दिसत आहे. त्यांनी या फोटोला कॅप्शन दिले, "आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरू करत आहोत"
कतरिनाआणि विकीने ही आनंदाची बातमी जाहीर करताच, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. अभिनेत्री जान्हवी कपूरने "अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन! " असे लिहित आनंद व्यक्त केला. तर त्यांची खास मैत्रीण आणि अभिनेत्री नेहा धुपियाने देखील आनंद व्यक्त केलाय.
चाहत्यांनीही या जोडीवर भरभरून प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. एका नेटकऱ्याने लिहिले, "तीन वर्षांनंतर, अखेर 'रेडिट'ला शांती मिळाली! खूप आनंद झाला." दुसरा एक चाहता म्हणाला, "मिनी विककॅट लवकरच येत आहे."
एका चाहत्याने कतरिनाचे कौतुक करताना लिहिले, "बॉलिवूड स्टार आणि उद्योजिका म्हणून यश मिळवल्यानंतर आता कतरिना आईच्या भूमिकेतही कमाल करेल! तिच्या उत्तम आरोग्यासाठी खूप शुभेच्छा!" या बातमीमुळे कतरिना आणि विकीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ते या 'छोट्या पाहुण्या'च्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.