K Vaikunth: हिंदी सिनेमासाठी 3 दशकांपेक्षा अधिक योगदान देणारे, महान गोमंतकीय सिनेमॅटोग्राफर 'के. वैकुंठ'

K Vaikunth Cinematographer: के. वैकुंठ यांच्या वारशासंबंधी यावेळी सिने-इतिहासकार पवन झा यांच्याशी सुसंवाद साधला जाणार असून त्याद्वारा के. वैकुंठ यांच्या प्रतिभाशाली कारकीर्दीवर प्रकाशझोत टाकला जाईल.
Cinematographer K Vaikunth legacy
K Vaikunth birth centenaryDainik Gomantak
Published on
Updated on

हिंदी सिने जगतातील एक महान गोमंतकीय सिनेमाटोग्राफर स्व. के. वैकुंठ यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून येत्या शनिवार २० रोजी येथील मॅकिनेझ पॅलेस थिएटरमध्ये, संध्या. ५.३० वाजता, गोवा मनोरंजन सोसायटीच्या सिने फाईल क्लबतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमात के. वैकुंठ यांच्या वारशासंबंधी यावेळी सिने-इतिहासकार पवन झा यांच्याशी सुसंवाद साधला जाणार असून त्याद्वारा के. वैकुंठ यांच्या प्रतिभाशाली कारकीर्दीवर प्रकाशझोत टाकला जाईल. के. वैकुंठ यांचे छायाचित्रण असलेल्या गाजलेल्या आँधी चित्रपटाचे प्रदर्शन यानिमित्ताने केले जाणार आहे.

मडगाव येथे जन्मलेले के. वैकुंठ हे सिनेमाटोग्राफी क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व असूनही त्यांच्या कार्याची अपेक्षेएवढी दखल घेतली गेली नाही. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी हिन्दी सिनेमा क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. गुलजार यांच्याबरोबर त्यांचे 'परिचय', 'कोशिश', 'अचानक', 'मौसम', 'खुशबू' आणि 'आँधी' आदी चित्रपट उल्लेखनीय आहेत.

Cinematographer K Vaikunth legacy
Juje Konkani Movie: जगभर पुरस्कार, गोव्यात मात्र ‘क' वर्ग; ‘जुझे’ सिनेमाच्या श्रेणीवरून नाराजी; ‘ईएसजी'कडून गळचेपीचा दावा

दिग्गज चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांच्याबरोबर त्यांनी 'अंदाज' (१९७१) आणि 'सीता और गीता' (१९७२) या चित्रपटांसाठी अप्रतिम छायाचित्रण केले आहे. त्यापैकी 'सीता और गीता' या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला होता. रामानंद सागर, मनमोहन देसाई अशा दिग्गजांबरोबरही त्यांनी काम केले आहे. 

Cinematographer K Vaikunth legacy
Waves Film Bazaar: खुशखबर! पणजीत भरणार आशियातील सर्वांत मोठा ‘वेव्हज फिल्म बाजार’; वाचा संपूर्ण माहिती

शनिवारी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात, आँधी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पवन झा यांच्याबरोबर विशेष सुसंवाद होणार आहे. पवन झा यांचा चित्रपट इतिहास संशोधनात काही दशकांचा अनुभव असून, यावेळी ते वैकुंठ यांच्यासंदर्भात आँधी चित्रपट निर्मितीदरम्यानच्या दुर्मिळ प्रसंगांची माहिती उपस्थितांसमोर सादर करतील. के. वैकुंठ यांचे सुपुत्र अमित कुंकळयेंकर हे या कार्यक्रमास उपस्थित असणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com