IFFI Golden Peacock Award: कुणाला मिळणार 'गोल्डन पिकॉक' अवॉर्ड? उत्सुकता शिगेला..

IFFI 2025 Award: २०२५च्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या दिवसात उत्तर समुद्रतील अम्रम बेटावर घडणारी ही कथा आहे.‌
IFFI Goa Golden Peacock winners
IFFI Goa Golden Peacock winnersDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात कोणते चित्रपट आहेत याची उत्सुकता सर्वांनाच असते. या विभागातील विजेत्या चित्रपटाला मिळणारा गोल्डन पीकॉक हा पुरस्कार जागतिक चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक आहे. यंदा नामवंत भारतीय चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय ज्युरी मंडळ गोल्डन पीकॉकसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडणार आहे.

अम्रम

दिग्दर्शक - फतीह अकीन

२०२५च्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या दिवसात उत्तर समुद्रतील अम्रम बेटावर घडणारी ही कथा आहे.‌ बारा वर्षांचा नॅनिंग युद्धाच्या प्रदीर्घ परिणामांमुळे आपली ओळख गमावून बसला आहे. ढासळणाऱ्या विचारसरणीने त्याचा भ्रमनिरास केला आहे. निरागसता आणि कठोर वास्तव यांच्यातील नाजूक तणाव तो अनुभवत आहे. 

अ पोएट 

दिग्दर्शक - सिमोन मेसा सोटो

हा चित्रपट एक ट्रॅजी-कॉमेडी आहे. कान्स चित्रपट महोत्सवात अन सर्टेन रिगार्ड विभागात या चित्रपटाने जुरी पारितोषिक जिंकले आहे आणि 98 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी कोलंबिया देशाची ही अधिकृत प्रवेशिका आहे. वृद्ध कवी ऑस्कर रास्ट्रेपो आणि एक प्रतिभावंत तरुणी त्यांची ही विनोदी कहाणी, हरवलेला गौरव परत मिळवण्याच्या हताश प्रयत्नांबद्दल आहे.

सेस्ट सी बॉन

दिग्दर्शक - डियाने कुर्य्स 

प्रसिद्ध फ्रेंच चित्रपट निर्माते सिमोन सिग्नोरेट आणि एस मोंन्टॅंड यांच्यातील हृदयस्पर्शी प्रेमकथेच्या शेवटच्या वर्षाचे चित्रण यात आहे. कान्स चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.‌ त्यांच्या राजकीय श्रद्धा, शाश्वत प्रेम आणि नात्याची परीक्षा घेणाऱ्या आव्हानांचा आढावा ही कथा घेते.

लिटल ट्रबल गर्ल्स 

दिग्दर्शक - उर्स्का द्जुकीक

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी स्लोव्हेनियाचीही अधिकृत प्रवेशिका आहे.‌ मुलींच्या कॉयर (गायन) ग्रूपमध्ये असलेली सोळा वर्षांची लुसिया जागृतीच्या गहन अनुभवांना सामोरी जात आहे 

मॉस्किटोस 

दिग्दर्शन - वेलेंटीना आणि निकोल बेर्तानी

लोकार्नो चित्रपट महोत्सवात प्रीमियर झालेल्या या चित्रपटाला गोल्डन लेपर्डसाठी नामांकन मिळाले होते. १९९० दशकातील ही एक ऑफ बीट कॉमेडी आहे, ज्यात तीन मुली एकमेकांचे, त्यांच्या तारुण्याचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी एका बंधनात एकत्र येतात. 

मदर्स बेबी

दिग्दर्शक - जोहाना मोदेर

या मानसशास्त्रीय थ्रिलरचा प्रीमियर बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. जुलिया ही ४० वर्षांची महिला आहे, जिचे आई होण्याचे स्वप्न उध्वस्त होते आणि ते एका दु:स्वप्नात बदलते. हा चित्रपट आधुनिक मातृत्वाच्या गुंतागुंतींचा शोध घेतो.

माय फादर्स शॅडो

दिग्दर्शक - अकिनोला डॅविस ज्यु. 

कान्स महोत्सवात अधिकृत निवडलेला हा पहिला  नायजेरियन चित्रपट आहे. या चित्रपटाला कॅमेरा डी'अॉर विभागात विशेष उल्लेख पुरस्कारही लाभला.‌ नायजेरियाच्या निवडणुकीतील राजकीय अशांततेदरम्यान लागोसमध्ये असलेल्या एका पिता-पुत्रांची ही आत्मचरित्रात्मक कहाणी आहे.

रेनॉईर

दिग्दर्शक - ची हायाकावा 

ही कहाणी टोकियो शहराच्या उपनगरात घडते.‌ अकरा वर्षांची फुकी तिच्या वडिलांच्या गंभीर आजाराचा आणि आईच्या संघर्षाचा अनुभव घेत टेलिपथीच्या काल्पनिक जगात प्रवेश करते. उपचार आणि कल्पनाशक्ती या संकल्पनांचा हा आकर्षक दृश्यात्मक अविष्कार आहे. 

शाम

दिग्दर्शक - तोकाशी मिके

हा एक कोर्ट ड्रामा आहे.‌ त्रिबेका आणि मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर झालेल्या या चित्रपटात विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकाच्या कथेद्वारा नैतिकता, सत्य आणि मानवी धारणा तपासली जाते. 

स्किन ऑफ युथ 

दिग्दर्शक - अॅश  मेफेयर 

न्यूयॉर्क आशियाई चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला विशेष जुरी पुरस्कार लाभला आहे. हा व्हिएतनामी चित्रपट १९९० च्या दशकातील सायगॉनमधील सेन आणि नाम यांच्या‌ अनिश्चित जीवनाचे आणि त्यांच्या संघर्षाचे चित्रण करते. मानवता आणि स्वातंत्र्याच्या सीमांचा शोध घेणारी ही एक वादळी प्रेमकथा आहे.

सॉंग्स ऑफ आदम 

दिग्दर्शक - ओदाय रशीद 

रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर झाला आहे. आजोबांच्या मृत्यूचा साक्षीदार असलेल्या मुलाचे वयस्कर होणे आपोआप थांबते. निरागसता, स्थिरता आणि राष्ट्राच्या अशांत इतिहासाचे हे रूपक आहे.

द व्हिजुअल फॅमिनीस्ट मॅनिफेस्टो 

दिग्दर्शक - फरिदा बाकी 

रोटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला युवा जुरी पुरस्कार मिळाला. एका अज्ञात अरब शहरात, एका तरुणीच्या जन्मापासून प्रौढत्वापर्यंतच्या प्रवासाचा पट या चित्रपटात उलगडतो. इच्छा, स्वातंत्र्य आणि पितृसत्ताक अवज्ञांचा परिणाम ही तरुणी भोगते आहे.

IFFI Goa Golden Peacock winners
IFFI 2025: आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कारप्राप्त कोंकणी चित्रपट ‘आसेसांव’ का दुर्लक्षित? इफ्फी समावेशाची कलावंतांची मागणी

अमरन

दिग्दर्शक - राजकुमार पेरियासामी 

युद्ध कथांवर आधारित पुस्तकातील एका कथेवर हा चरित्रात्मक चित्रपट आधारलेला आहे. २०१४च्या काझीपाथरी ऑपरेशनवर आधारलेला हा चित्रपट मेजर मुकुंद वरदराजन यांचे शौर्य आणि बलिदान याबद्दल सांगतो. 

सरकीत (आ शॉर्ट ट्रिप)

दिग्दर्शक - थलवा के. व्ही.

एडीएचडीचे निदान झालेल्या मुलाचे आई-वडील आपल्या मुलासह परदेशात संघर्ष करत आहेत. जेव्हा अमीर त्यांच्या आयुष्यात प्रवेश करतो तेव्हा त्यांच्यामधील शांत संबंध आणि त्यांचे नाजूक जीवन अनपेक्षित मार्गाने कसे बदलू शकते हे प्रत्ययाला येते. 

IFFI Goa Golden Peacock winners
IFFI 2025: इफ्‍फीचे उद्‍घाटन होणार शानदार! चित्ररथ मिरवणुक रंगणार; गोव्यातील चित्रपट संस्‍कृतीचे होणार दर्शन

गोंधळ 

दिग्दर्शक - संतोष दावखर

प्रेमविहीन विवाहात अडकलेली सुमन, तिचा प्रियकर, गोंधळी कलाकार साहेबराव याच्यासोबत पळून जाण्याचा विचार करते.‌ ह्या उत्कट आणि पर्यावसनी कथेत विश्वास, विश्वासघात, दैवी न्याय आदी घटकांची वीण एका रात्रीत बांधली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com