IFFI 2025: 'जागतिक सिनेमा गोव्‍यात अनुभवता यावा, हेच आमचे प्रथम लक्ष्‍य’! NFDCचे तांत्रिक विभागप्रमुख यादव यांचे स्पष्टीकरण

Goa IFFI 2025: सामाजिक, राजकीय बंधनमुक्‍त ‘इफ्‍फी’ असावा, अशी तमाम सिनेकर्मी, रसिकांची कायमच इच्‍छा राहिली आहे. तसे प्रतिबिंब मात्र कधी उमटले नाही.
IFFI 2025
IFFI 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

राजू नायक

सामाजिक, राजकीय बंधनमुक्‍त ‘इफ्‍फी’ असावा, अशी तमाम सिनेकर्मी, रसिकांची कायमच इच्‍छा राहिली आहे. तसे प्रतिबिंब मात्र कधी उमटले नाही. आता ‘एनएफडीसी’ अर्थात राष्‍ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने त्‍यासाठी पावले उचलली आहेत. स्‍वायत्ततेच्‍या माध्‍यमातून उपरोक्‍त संकल्‍पनेला मूर्त रूप मिळू शकते, असा आशावाद बळकट होत आहे.

‘‘आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सव पुढील काळात स्‍वायत्त होईल. आवश्‍‍यक दर्जात्‍मक उंची गाठण्‍याचे प्रयत्‍न सुरू असून, त्‍याला चित्रपट निर्मितीशी निगडित घटकांचे योगदान अपेक्षित आहे. याकामी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे संपूर्ण सहकार्य लाभत आहे. निकोप संस्‍कृती रुजविण्‍याची बिजे रोवली गेली आहेत, त्‍यात यश नक्‍कीच लाभेल’’, असा निःसंदिग्ध विश्‍‍वास माहिती प्रसारण मंत्रालय नियुक्‍त ‘एनएफडीसी’चे तांत्रिक विभागप्रमुख राम सहाई यादव यांनी ५६ व्‍या इफ्‍फीत ‘गोमन्‍तक’शी बोलताना व्‍यक्‍त केला.

यादव हे गेली वीस वर्षे चित्रपट महोत्‍सव आयोजन, चित्रपट निवड प्रक्रियेशी संलग्‍न आहेत. त्‍यांनी योगदान दिले आहे. गोव्‍यात होणाऱ्या इफ्‍फीचे ते पहिल्‍या वर्षापासून साक्षीदार आहेत. यंदाचा इफ्‍फी लोकांना आवडला, असे एकंदर वातावरण आहे. विशेषतः आंतरराष्‍ट्रीय चित्रपट निवड. हे वेगळेपण कायम राहणे आवश्‍‍यक आहे. इफ्‍फीला लौकिक अर्थाने जागतिक दर्जा प्राप्‍त होण्‍यासाठी विचारसरणीची कुंपणे भेदून ‘कान्‍स’प्रमाणे निकोप दृष्टिकोनाचा अवलंब गरजेचा आहे.

त्‍या अनुषंगाने यादव यांच्‍याशी वार्तालाप करताना भविष्‍यात सकारात्‍मक बदलांची ते ग्‍वाही देतात. ‘‘चित्रपट महोत्‍सवात ‘निवड’ हा निकष शीर्षस्‍थानी राहतो. चित्रपट महोत्‍सव संचालनालयाकडून (डीएफएफ) चित्रपट विकास महामंडळाकडे इफ्‍फीचे नियोजन हस्तांतरित केल्‍यानंतर दरवर्षी काही ना काही सुधारणा होत आहेत. जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट हेरून ते इफ्‍फीत प्रदर्शित व्‍हावेत, यासाठी आमच्‍या टीमने भरपूर मेहनत घेतली.

IFFI 2025
Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

इफ्‍फीत देश-विदेशातून चित्रपट रसिक, सिनेकर्मी येतात. त्‍यांचा बिलकूल हिरमोड होता नये, याचे भान आम्‍ही बाळगत आहोत. जागतिक सिनेमा गोव्‍यात रसिकांना अनुभवता यावा, हेच आमचे सध्‍याचे प्रथम लक्ष्‍य आहे’’, असे यादव म्‍हणाले. ‘‘जगभरातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वितरक यांना भेटून इफ्‍फीसाठी चित्रपट पाठवा, असे आवाहन करण्‍यात येते. त्‍यासाठी वर्षभर श्रम घेतले जातात. सिने संस्‍कृती प्रगल्‍भ आहे, त्‍याचे दर्शन इफ्‍फीत घडविण्‍याचा कसोशीने यत्‍न आहे. ‘एनएफडीसी’ला अधिक मेहनत घ्‍यावीच लागणार आहे.

IFFI 2025
IFFI 2025: 'पर्रीकरांनी हा महोत्सव गोव्यात आणला ही मोठी भाग्याची गोष्ट', तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे गौरवोद्गार

सोबत चित्रपट निर्माते, सिनेरसिकांचेही आपल्‍या परिने योगदान हवे. गोवा मनोरंजन सोसायटी इफ्‍फीसाठी छान काम करत आहे’’, अशी त्‍यांनी प्रशंसा केली. सिनेमातून जगरहाटीचे दर्शन घडते. इतिहासाचा दाखला, वास्‍तवाचा आरसा आणि भविष्‍याचा वेध घेणाऱ्या चित्रपटांचा मेळा अर्थात ‘इफ्‍फीवरील ठरावीक विचारांचे सावट हटेल, महोत्‍सव मोकळा श्‍‍वास घेईल, हा आशावादही नसे थोडका. स्‍वायत्त इफ्‍फी होईल, तेव्‍हाच तो सुदिन ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com