
मुंबई: द लेटेन्ट शोमुळे वादात सापडलेल्या समय रैनाने मोठ्या कालावधीनंतर भारतात एन्ट्री केली आहे. अलिकडेच त्याने भारतात विविध ठिकाणी शोची घोषणा केली असून, त्याच्या तिकीट विक्रीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. लेटेन्ट शोमुळे वादात सापडल्यानंतर त्याने विदेशात अनेक शो केले. भारतात पण त्याला त्याच्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कॉमेडियन समय रैनाची आजच्या तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्याच्या स्टॅडअपशोसाठी लाखोंची गर्दी पाहायला मिळते. अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात आलेला समय रैना नेमका महिन्याला किती रुपये कमावतो? एका शोसाठी त्याची फी किती आहे? युट्युब आणि इतर सोशल मिडिया माध्यमांवरुन त्याला किती रुपये मिळतात? याचं गणित अनेकांनी माहिती नाही.
रैनाच्या कमाईचे गणित एका नेटकऱ्याने सविस्तरपणे समजावून सांगितले आहे. चला तर जाणून घेऊया समय रैनाच्या कमाईचे गणित नेमकं कसं आहे? Reddit वर एका युझरने समय रैनाच्या कमाईचे गणित समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
पहिला मुद्दा
मुंबईत झालेल्या त्याचा शोचे तिकीट १,५०० रुपये होते, याठिकाणी २५,००० सीट होत्या. याचे एकूण रक्कम ३.७५ कोटी होते (४हजार व्हिआयपी पास वगळून)
१) १८ टक्के जीएसटीचे ५७ लाख गेले
२) जागेचं भाडं, प्रोडक्शन कॉस्टसाठी ४० ते ६० लाख
३) नियोजन आणि ऑनलाईन तिकीट प्लॅटफॉर्मसाठी लागणारी फी (१० ते १५ टक्के)
४) प्रसिद्धी आणि आयोजक यांची फी
हे सगळं वजा करुन त्याला दोन कोटी रुपये मिळतात. असे एका महिन्यात तो चार शो करतो. याशिवाय युएस टूर, युट्युबमधून मिळणारा पैसा, खासगी व्यावसायिक शो यांचाही यात समावेश आहे.
दुसरा मुद्दा
लेटेन्ट शो सुरु असताना त्याचे एक मिलियन सबस्क्राईबर होते, यात ५९ रुपये महिना देणारे सबस्क्राईबरही होते. (४०० रुपये महिना देणारे वगळून) तो महिन्याला सहा कोटी रुपये कमवतो.
यातून २० टक्के इतर खर्च आणि टॅक्स कट होतो. तरीही त्याच्याकडे ३.४ कोटी रुपये शिल्लक राहतात.
याचा अर्थ दोन्हींची बेरीज केली तर समय रैना महिन्याला दहा ते अकरा कोटी रुपये आरामात कमवतो, असा या विश्लेषणावरुन अंदाज लावता येऊ शकतो. पण, याबाबत अधिकृत माहिती अथवा आकडेवारी उपलब्ध नसल्याने निश्चित एवढीच रक्कम असेल असे सांगता येत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.