Video: FA9LA ची 'ट्रेंडिंग' स्टेप अक्षयने बसवली! डान्स कोरियोग्राफरचा खुलासा; म्हणाला, लडाखची उंची, हातात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन तो...

Akshaye Khanna FA9LA Step: या गाण्याच्या शूटिंगदरम्यान अक्षय खन्नाला लडाखच्या अतिउंच ठिकाणी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला
FA9LA Trending Step
FA9LA Trending StepDainik Gomantak
Published on
Updated on

Akshaye Khanna FA9LA video: अभिनेता अक्षय खन्ना याचा 'धुरंधर' चित्रपटातील रहमान डकैत या भूमिकेचा एन्ट्री सीन सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. विशेषतः या एन्ट्री सीनसाठी वापरलेले 'FA9LA' हे गाणे खूप ट्रेंडमध्ये आहे. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान अक्षय खन्नाला लडाखच्या अतिउंच ठिकाणी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, याचा खुलासा चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी एका मुलाखतीत केला आहे.

'ऑक्सिजन सिलेंडर घेऊन ॲक्शन': विजय गांगुली

'FA9LA' हे गाणे बहरीनचा हिप-हॉप कलाकार फ्लिपराची याने तयार केले असून ते सध्या इन्स्टाग्रामवर जबरदस्त ट्रेंड करत आहे. हे गाणे लडाखमध्ये चित्रित होत असताना, उंचीमुळे येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी अक्षय खन्नाला स्वतःसोबत एक छोटा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरावे लागत होते.

विजय गांगुली यांनी मिड-डे ला सांगितले, "अक्षय सोबत एक छोटा ऑक्सिजन सिलेंडर ठेवत असे. आम्ही हे गाणे शूट करत असताना, त्याचा ऑक्सिजन स्तर कमी झाला होता. त्यामुळे प्रत्येक शॉट झाल्यावर तो ऑक्सिजन मास्क लावत असे. त्याने हा सीन न कंटाळता, न थांबता पूर्ण केला आणि त्यानंतर तो घरी गेला."

'शेर-ए-बलूच'चा उत्स्फूर्त डान्स

विजय गांगुली यांनी गाण्याच्या मूळ कल्पनेबद्दलही सांगितले. ते म्हणाले, "हे गाणे अक्षयच्या पात्राला 'शेर-ए-बलूच' चा 'किताब मिळाल्यावेळी शूट करण्यात आलं. मूळात, त्याने फक्त एन्ट्री करायची होती, डान्सर्समधून चालायचे होते आणि सिंहासनावर बसायचे होते."

पुढे अक्षय खन्नाने स्वतःहून या सीनमध्ये बदल केला. "सीनचा मूड आणि डान्सर्सचा परफॉर्मन्स पाहून, अक्षयने सांगितले की, तो आतमध्ये येताना थोडा डान्स करेल. त्याने हे उत्स्फूर्तपणे केले, आम्ही कोणालाच माहीत नव्हते की तो काय करणार आहे," असे गांगुली यांनी सांगितले.

FA9LA Trending Step
Dhurandhar Review: क्षणोक्षणी थरार, अभिनयात जोश, क्रूरतेत धार; रणवीर सिंग-अक्षय खन्नासमोर आदित्य धर का ठरतोय 'धुरंधर?'

फक्त २ तासांत गाण्याचे शूटिंग पूर्ण

लडाखमधील आव्हाने असूनही, हे संपूर्ण गाणे फक्त २ तासांत शूट करण्यात आले. याचे श्रेय विजय गांगुली यांनी अक्षय खन्नाच्या कामातील अचूकतेला दिलेय. "तो त्या दिवसाचा आमचा पहिला शॉट होता आणि तो परफेक्ट होता. त्यानंतर आम्ही फक्त एक क्लोज-अप शॉट घेतला आणि शूटिंग पूर्ण झाले.

अक्षयला त्याला सीनमध्ये नेमके काय करायचे आहे हे बरोबर माहीत असते आणि तो त्यात खेळतो," असे गांगुली यांनी सांगितले.आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून, यात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com