

Doraemon stopped in Indonesia: गेल्या तीन दशकांहून अधिक काळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करणारा 'डोरेमॉन' या जपानी कार्टूनने आता इंडोनेशियातील प्रसिद्ध 'आरसीटीआय' (RCTI) चॅनलवरून कायमचा निरोप घेतला आहे. ३७ वर्षांच्या अविरत प्रसारणा नंतर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे आशिया खंडातील कोट्यवधी चाहते भावूक झाले आहेत. मात्र, ही बातमी भारतात पोहोचताच भारतीय प्रेक्षकांमध्ये "भारतातही डोरेमॉन बंद होणार का?" अशी चर्चा सुरू आहे.
१९८० च्या दशकापासून इंडोनेशियातील आरसीटीआय चॅनलवर डोरेमॉनचे प्रक्षेपण सुरू होते. हा केवळ एक कार्टून शो नव्हता, तर अनेक पिढ्यांसाठी शाळेतून आल्यावरचा विरंगुळा होता. नोबिताचे दररोजचे प्रश्न आणि डोरेमॉनच्या खिशातील जादूची गॅजेट्स यांनी प्रेक्षकांना मैत्री, दयाळूपणा आणि आशेचा किरण दाखवला.
इंडोनेशियातील ही बातमी सोशल मीडियाद्वारे भारतात पोहोचली तेव्हा अनेक चाहत्यांना वाटले की डोरेमॉन भारतातूनही गायब होईल. भारतात हा शो 'हंगामा टीव्ही' आणि 'डिस्ने चॅनल'वर सर्वाधिक पाहिला जातो. अलीकडेच रिलायन्सच्या 'वायकॉम १८' (Viacom18) आणि 'डिस्ने' यांच्यातील विलीनीकरणामुळे चॅनेल्सच्या अधिकारांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा शो बंद होईल अशी भीती चाहत्यांमध्ये पसरली आहे.
मात्र भारतातून डोरेमॉन सध्या कुठेही जाणार नाही. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात या शोचे प्रक्षेपण सुरूच राहणार आहे. केवळ इंडोनेशियातील एका विशिष्ट चॅनलने त्यांचे प्रसारण थांबवले आहे.
भारतीय चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे की त्यांचे आवडते कॅरेक्टर अजूनही टीव्ही पडद्यावर कायम राहणार आहे. सध्या इंडोनेशियातील आरसीटीआय चॅनलवरील हा शेवटचा भाग एका युगाचा अंत मानला जात आहे. "डोरेमॉन आमच्या स्क्रीनवरून गेला असला तरी आमच्या हृदयात तो कायम राहील," अशा भावना जगभरातील चाहते व्यक्त करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.