Shravan Fondekar: Costao सिनेमातील नवाजुद्दीन सिद्दीकीचा इन्फॉर्मर, गोमंतकीय अभिनेता 'श्रावण'

Shravan Fondekar Costao Movie: ६ मे १९९१ या दिवशी स्मगलिंगच्या संबंधात गोव्यात एक घडलेल्या एका बहुचर्चित घटनेवर आधारलेला हिन्दी चित्रपट ‘कॉस्तांव’ १ मे २०२५ रोजी ओटीटी माध्यमातून रिलीज झाला.
Shravan Fondekar Costao Movie
Costao Movie Goan ActorsDainik Gomantak
Published on
Updated on

१६ मे १९९१ या दिवशी स्मगलिंगच्या संबंधात गोव्यात एक घडलेल्या एका बहुचर्चित घटनेवर आधारलेला हिन्दी चित्रपट ‘कॉस्तांव’ १ मे २०२५ रोजी ओटीटी माध्यमातून रिलीज झाला. ती ‘घटना’ गोव्यात घडल्यामुळे आणि या घटनेचा संबंध उच्च वर्तुळातील राजकीय नेत्याशी संबंधित असल्यामुळे या चित्रपटासंबंधी गोव्यात बरीच उत्सुकता होती. त्याशिवाय या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी या दिग्गज अभिनेत्याची मुख्य भूमिका असल्यामुळे या चित्रपटाची बरीच हवाही झालेली आहे.

या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी एका कस्टम अधिकाऱ्याची भूमिका रंगवतो आहे आणि त्याला  स्मगलिंगच्या संदर्भात टीप देणाऱ्या इन्फॉर्मरची भूमिका रंगवली आहे गोव्याचाच एक अभिनेता श्रावण फोंडेकर याने. श्रावण हा गोव्यातील रंगमंचावर सातत्याने काम करणारा अभिनेता आहे. ललित कला अकादमीमधून परफॉर्मिंग आर्टचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या श्रावणने अनेक उल्लेखनीय नाटकांमधून काम केले आहे.

कॉस्तांव या चित्रपटातल्या त्याच्या महत्त्वाच्या भूमिकेविषयी सांगताना श्रावण म्हणतो:

या चित्रपटात काम करण्याविषयी कास्टिंग कॉल मला दोन वर्षांपूर्वी त्यांच्या कास्टिंग डिरेक्टरकडून मुंबईतूनच आला होता. मी माझा प्रोफाइल त्यांना पाठवल्यानंतर मी या भूमिकेसाठी शॉर्टलिस्ट झालो होतो. त्यानंतर त्यांनी मला व्हाट्सअपवरुनच ऑडिशन पाठवायला सांगितले.‌ ते मी पाठवल्यानंतर त्यांनी त्या भूमिकेसाठी मला निवडले. 

सुमारे नऊ दिवस माझे या चित्रपटासाठी शूटिंग चालले होते. चित्रपटातील माझे सारे सीन नवाजुद्दीन सिद्दिकी सरांबरोबरच आहेत. कस्टम खात्याचा मी एक महत्त्वाचा इन्फॉर्मर असतो जो कस्टम अधिकारी कॉस्तांव (नवाजुद्दीन सिद्दिकी) यांना स्मगलिंगच्या संदर्भात माहिती देत असतो.‌ मात्र हा अधिकारी सोडून इतर कुणालाही माझ्याबद्दल माहिती नसते आणि तो अधिकारी देखील या इन्फॉर्मरची ओळख इतरांना खुली करत नाहीत. 

Shravan Fondekar Costao Movie
Costao Movie: 1991 साल, 8 कोटींची सोने तस्करी; गोव्याचे अधिकारी कॉस्ताव यांच्यावर चित्रपट, मुख्य भूमिकेत 'नवाजुद्दीन सिद्दीकी'

खरे तर ऑडिशनमधून मी पहिल्यांदाच एका चित्रपटात भूमिका करण्यासाठी निवडलो गेलो होतो. त्यामुळे मला पुढील प्रक्रियेबद्दल काहीच ठाऊक नव्हते. त्यामुळे अनेक चुका करत मी त्यातून शिकत गेलो. मध्यंतरी नवाजुद्दीन सिद्दिकी यांचा अपघात झाल्यामुळे  या सिनेमाचे चित्रीकरण पुढे ढकलले गेले. नंतर हा चित्रपट पूर्ण होईल की नाही याच्याबद्दलही मला शंका होती परंतु अचानक मला कॉल आला की आम्ही शूटिंग पुन्हा सुरू करत आहोत. नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव फारच छान होता. 

Shravan Fondekar Costao Movie
Costao Movie: 'कॉस्ताव'ला क्लीन चिट!! न्यायालयाने आलेमावांची याचिका फेटाळली; 1 मे पासून झी-5 वर प्रदर्शित

मी हिंदी भाषिक नाही आणि त्यात भर म्हणजे चित्रपटात काम करण्याचा मला फारसा अनुभवही नव्हता. त्यामुळे अनेकदा शूटिंगच्या वेळी इम्प्रोवाईज करताना मला समस्या निर्माण व्हायची, अडखळायला व्हायचे. परंतु ' होगा...होगा... बहोत ही अच्छा करता है तू...' अशा शब्दांनी नवाजुद्दीन सर धीर द्यायचे. अनेकदा ते स्वतःच्याच तंद्रीत असायचे. अर्थात मी देखील नवखा असल्याकारणाने त्यांच्याशी फार बोलायला जात नसे.  नवाजुद्दीन सिद्दिकी सारख्या अभिनेत्याबरोबर काम करणे हे माझे एक स्वप्नच होते. ते अशा प्रकारे खरे होईल त्याचा मी विचारही केला नव्हता. गोव्यात रंगमंचासंदर्भात काम कसे चालले आहे याबद्दल ते विचारायचे. आम्हीही गोव्यात काय आणि कशाप्रकारे काम करत आहोत हे मी त्यांना सांगायचो. अर्थात ते जेवढे विचारायचे तेवढेच उत्तर मी त्यांना द्यायचो. त्यापेक्षा अधिक बोलायला मी जात नसे. गोवा आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी माझे शूट झाले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतीत मी स्वतः खूप रोमांचित आहे.’ ....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com