Vikrant Massey in Goa: बॉलीवूडला अलविदा केलेला विक्रांत गोव्यात; हिराणींसोबत सुरुये 'या' सिरीजचं शूटिंग

Vikrant Massy Goa Shooting: प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत विक्रांत पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे
Vikrant Massey Web Series
Vikrant Massey Web Series Dainik Gomantak
Published on
Updated on

Vikrant Massey: काही दिवसांपूर्वी 12th फेल या चित्रपटानंतर घराघरामध्ये पोहोचलेला अभिनेता विक्रांत मेस्सी चित्रपटांच्या दुनियेला कायमचा अलविदा करणार अशा बातम्या फिरत होत्या, मात्र आता विक्रांत बद्दल समोर आलेल्या नवीन माहितीने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत विक्रांत पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे, आणि महत्वाची बाब म्हणजे विक्रांत याच शूटिंगसाठी गोव्याच्या दिशने वाळलाय.

विक्रांतची ही सिरीज नेमकी आहे काय याबद्दल आणखीन माहिती अद्याप मिळालेली नाही, मात्र विक्रांत मेस्सी सध्या या सिरीजच्या चित्रीकरणासाठी गोव्यात आलाय. तरीही अद्याप विक्रांत किंवा राजकुमार हिराणी यांच्याकडून या सिरीजबद्दल अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

विक्रांतचा अलविदा?

काही दिवसांपूर्वी विक्रांत मेस्सी याने बॉलीवूडला कायमचा रामराम ठोकल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट 12th फेल चित्रपटाच्या यशानंतर समोर आल्याने चाहत्यांना धक्काच बसला होता, मात्र यानंतर विक्रांत याने समोर येत त्याच्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावला गेलंय असं स्पष्टीकरण दिलं होतं.

Vikrant Massey Web Series
Vikrant Massey: विक्रांतने का ठेवलं मुलाचं नाव 'वरदान'? पोस्ट शेअर करत सांगितलं कारण

विक्रांत म्हणाला होता की तो काय चित्रपट सृष्टीला कायमचा सोडून चालेल नाही तर काही दिवसांसाठी ब्रेक घेत आहे. "अभिनय माझ्यासाठी सगळं काही आहे, मात्र मानसिक आणि शारीरिक ताण दूर करण्यासाठी आणि काहीवेळ परिवारासोबत घालवण्यासाठी मी ब्रेक घेतोय" असं विक्रांत म्हणाला होता आणि चाहत्यांच्या निस्सीम प्रेमासाठी देखील त्यांचे आभार मानले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com