Bhumi Pednekar: 'मी मूळची पेडण्याची, मला गोव्याची असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो'; अभिनेत्री भूमी पेडणेकरनं सांगितलं गोवा कनेक्शन

Bhumi Pednekar Goa Connection: मी मूळची पेडण्याची आहे. मला गोव्याची असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो. या मातीने मला नाव, मूल्ये आणि संस्कार दिले आहेत.
Bhumi Pednekar Goa Connection
Bhumi PednekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मी मूळची पेडण्याची आहे. मला गोव्याची असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो. या मातीने मला नाव, मूल्ये आणि संस्कार दिले आहेत. त्यामुळे गोव्यात मी पर्यटक किंवा पाहुणी म्हणून कधीच येत नाही. या मातीशी माझे खास नाते जोडलेले आहे, असे प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी सांगितले.

‘पॅक्ट’ संस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त भूमी पेडणेकर गोव्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी गोव्याशी असलेल्या आपल्या नात्याविषयी भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाला ‘पॅक्ट’चे संस्थापक ॲड. अश्विन फर्नांडीस, प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली, अभिनेते राहुल बोस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘मांडवी रेडिओ’ आणि ‘फ्युचर रेडी फॉर गोवा’ या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.

Bhumi Pednekar Goa Connection
Goa Tribal Reservation: आरक्षण म्हणजे फक्त आमदारकीची खुर्ची नव्हे; आदिवासींच्या सत्तेतील निर्णायक वाट्याचा लढा

दरम्यान,‘पॅक्ट’ संस्थेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण शाळांच्या विकासासाठी योगदान दिले जात आहे. राज्यातील ४१ हून अधिक शाळांमधील २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देण्यात योगदान देता आल्याचे समाधान आहे, असे ॲड. अश्विन फर्नांडीस यांनी सांगितले.

आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवा: इम्तियाज अली

इम्तियाज अली म्हणाले की, जगातील प्रत्येक व्यक्तीत समान क्षमता आहे. मात्र, अनेकदा आपण मागे पडतो किंवा आपल्याला नेमके काय करायचे हे समजत नाही. अशावेळी आपल्यावर साचलेली काजळी फुंकर मारून दूर करणाऱ्या मार्गदर्शकाची गरज असते. गोव्यात ‘पॅक्ट’ संस्थेच्या माध्यमातून हेच काम केले जात आहे. दिल्लीमध्ये शिक्षण घेत असताना आपले मन लेखन, नाटक आणि संगीत या क्षेत्रांत अधिक रमायचे. त्यामुळे याच क्षेत्रात काम करण्याची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली होती. त्यांनी त्याला होकार दिला; मात्र, ‘जे करायचे ते उत्तम करायचे,’ असा सल्लाही दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com