A R Rahman: घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला ए आर रेहमान; 'इफ्फी'तला Video पाहा

Iffi Goa 2024 A R Rahman Red Carpet: रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा यांनी गेल्या आठवड्यात विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
A R Rehman: घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला ए आर रेहमान; इफ्फीत लावली हजेरी Viral Video
A R Rehman At IFFI 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Iffi Goa 2024 A R Rahman Watch Video

पणजी: प्रसिद्ध संगीतकार, गायक ए. आर रेहमान यांनी नुकतेच गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. पत्नी सायरा बानू हिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच रेहमान यांनी सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावली. रेहमान यांच्या चित्रपट महोत्सवातील काही व्हिडिओ समोर आले आहेत.

ए. आर. रेहमान यांनी इफ्फीत रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. घटस्फोटानंतर हा त्यांची पहिलीच सार्वजनिक ठिकाणची उपस्थिती होती. रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा यांनी गेल्या आठवड्यात विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. २९ वर्षाच्या सुखी संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

A R Rehman: घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला ए आर रेहमान; इफ्फीत लावली हजेरी Viral Video
Cash For Job Scam: 'पतीला सरकारी नोकरीला लावते' सांगत दोघांना गंडा, उमा पाटीलला अटक

रेहमान यांनी इफ्फीत लावलेल्या उपस्थितीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. रेड कार्पेटवर हजेरी लावल्यानंतर रेहमान यांनी फोटोसाठी मिडियासमोर पोझ दिल्या. त्यानंतर पुढच्या कार्यक्रमासाठी रेहमान निघून गेले.

A R Rehman: घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला ए आर रेहमान; इफ्फीत लावली हजेरी Viral Video
Kavita Manoj Nair: मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून दाम्पत्य झालं गोव्यात स्थायिक, पैसा नव्हे तर 'हे' आहे कारण

लग्नाची तीस वर्षे पूर्ण करु अशी आशा होती पण प्रत्येक गोष्टीचा अप्रत्यक्ष अंत असतो, अशी प्रतिक्रिया रेहमान यांनी सोशल मिडियावरुन व्यक्त केली आहे. रेहमान आणि सायरा यांनी २९ वर्षाच्या नात्यातून विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय त्यांना खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुलं आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com