अपक्ष उमेदवारांकडून बंडाचा झेंडा कायम

30 जणांची माघार, 40 जागांसाठी 301 उमेदवार
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. राज्यातील 40 जागांसाठी 586 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यातील 382 अर्ज स्वीकारण्यात आले. यापैकी आज 34 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 301 उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. (Withdrawal of 30 independent candidates 301 candidates will contest for 40 seats for goa assembly election)

Goa Assembly Election 2022
कळंगुट येथील चार दुकानात भीषण आग

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) काही ठिकाणी पारंपारिक तर काही ठिकाणी नव्याने उमेदवार रिंगणात उतरल्याने अनेक ठिकाणच्या जागा प्रतिष्ठेच्या आणि लक्षवेधी बनल्या आहेत. यावेळी सत्ताधारी भाजपला सर्वाधिक बंडखोरीचा फटका बसणार असून पणजी, मांद्रे, सावर्डे, सांगे आणि कुंभारजुवे (Cumbarjua) येथे सत्ताधारी उमेदवारांना निवडून येण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. तर लक्षवेधी निवडणुकांमध्ये मडगाव येथून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या विरोधात

मंत्री बाबू आजगावकर आपले नशीब आजमावत आहेत. पणजी मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) निवडणूक लढवत आहेत. मांद्रे मतदारसंघातून आमदार दयानंद सोपटे यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दंड थोपटले आहेत. फातोर्डा मतदारसंघातून आमदार विजय सरदेसाई यांच्याविरोधात माजी आमदार दामू नाईक आपले नशीब आजमावत आहेत.

Goa Assembly Election 2022
अर्थसंकल्पात गोव्याच्या वाट्याला काय येणार? देशाची जीडीपी 8% राहण्याची शक्यता

सर्वाधिक चर्चेत बनलेल्या मुरगाव मतदारसंघातून माजी मंत्री मिलिंद नाईक विरुद्ध काँग्रेसचे संकल्प आमोणकर लोकांसमोर जात आहेत. तर नोकरभरतीवरून तिकीट नाकारलेल्या माजी मंत्री दीपक पाऊसकर हे भाजपच्या गणेश गावकर यांच्या विरोधात सावर्डे मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय सांगे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघातील निवडणूक रंगतदार बनली आहे.

शिवोलीत सर्वाधिक

मुख्यमंत्र्यांच्या साखळीमध्ये 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर शिवोलीत सर्वाधिक 13 जण आहेत. मांद्रे, पेडणे, मये, वास्को, कुठाळी आणि नावेली येथे प्रत्येकी 9 उमेदवार नशीब आजमावत आहेत. तर सर्वात कमी पर्वरी, सांताक्रुज, मडगाव व बाणावलीत प्रत्येकी 5 उमेदवार उभे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com