बाबू कवळेकरांना मुख्यमंत्रिपदाची लालसा: सुभाष फळदेसाई

भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर: सुभाष फळदेसाईंचा कवळेकरांवर आरोप
Babu Kavalekar
Babu KavalekarDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री यांनी सांगेतून अपक्ष निवडणूक लढविल्याने भाजपमधील असंतोष समोर आला आहे. बाबूंनी मुख्यमंत्रिपदाच्या लालसेने आपल्या पत्नीला सांगेत अपक्ष म्हणून उभे केले, असा आरोप सांगेचे माजी आमदार आणि सध्याचे भाजप उमेदवार सुभाष फळदेसाई यांनी केला.

Babu Kavalekar
युक्रेनियन लोकांचा पणजी चर्चसमोर शांततापूर्ण निषेध

आपली पत्नी आपले ऐकत नाही. आपल्या इच्छेविरुद्ध जाऊन तिने बंडखोरी केली आहे असा खुलासा कवळेकर यांनी केला होता. त्यावर फळदेसाई म्हणाले, हे फक्त दिखाऊपणाचे सोंग आहे. कवळेकर यांनी यापूर्वी आपल्या समर्थकांना आपण मुख्यमंत्री होऊ शकतो आणि आपली पत्नी निवडून आल्यास आपला दावा आणखी मजबूत होईल असे सांगितले होते. याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असे फळदेसाई म्हणाले.

Babu Kavalekar
मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी बँकेकडून घेणार कर्ज

आपण मुख्यमंत्री झालो तर आपली पत्नी आपल्या मंत्रिमंडळात निश्चितच मंत्री असणार, त्यामुळे केपेबरोबरच सांगेवासीयांचीही कामे होणार, त्यांना सरकारी नोकऱ्या मिळणार अशी आश्वासने कवळेकर यांनी सांगेतील लोकांना दिली आहेत याचीही आपल्याला माहिती मिळालेली आहे. निवडणुकीपूर्वी जर मी बोललो असतो तर त्याचा परिणाम केपेत होऊन भाजपचा एक आमदार कमी झाला असता. त्यामुळेच मी बोललो नाही. आता मतदान झाले आहे. त्यामुळे मी बोलत आहे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com