मतदान केंद्रात व्हिडिओ काढणं पडलं महागात

संशयित संदीप याने मतदानादरम्यान आपल्या मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले व नंतर ते सोशल मीडियावर पोस्ट केले.
Voting
Voting Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोव्यात सोमवारी विधानसभा निवडनुकीचे मतदान पार पडले. दरम्यान, पर्वरी मतदारसंघातील मतदान केंद्र 10 मध्ये संदीप मांजरेकर नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Goa Election Updates)

Voting
गोव्यात सत्तापालट होणार, आम्हालाच बहुमत मिळणार; कॉंग्रेसचा दावा

संशयित संदीप याने मतदानादरम्यान आपल्या मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले व नंतर ते सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केले. मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

या चित्रीकरणाद्वारे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा संशयिताविरुद्ध दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक डी. के. रेडकर तपास करत आहेत.

Voting
Goa Assembly Election: पणजी ताळगावात भाजपचीच सरशी

निवडणुकीदरम्यान अबकारी खाते (Excise Department) आणि गोवा पोलीस प्रशासन आचारसंहितेचा भंग होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडू नये यासाठी राज्यभर तैनात होते. निवडणूक आचारसंहितेच्या काळात पोलिस व अबकारी खात्याने घातलेल्या छाप्यात सुमारे 6.68 कोटींची रोख रक्कम, 3.57 कोटींचा मद्यसाठा, 2 लाखांचे सोने आणि चांदीच्या वस्तू तसेच 1.2 कोटींच्या अंमलीपदार्थांचा समावेश आहे.

या कालावधीत करण्यात आलेल्या धडसत्रात एकूण 12.72 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार (Inspector General of Police Rajesh Kumar) यांनी निवडणूक आयोगातर्फे (Election Commission) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com