कुंभारजुवे मतदारसंघात मडकईकरांचे स्थान ‘धोक्यात’

रोहनच्या बंडाचा परिणाम शक्य, फळदेसाईंचाही प्रचारात जोर
Pandurang Madkaikar
Pandurang MadkaikarDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

गोवा: कुंभारजुवे हा गेली कित्येक वर्षे माजी मंत्री पांडुरंग मडकईकरांचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2002 सालापासून मडकईकर हे कुंभारजुवेचे आमदार म्हणून निवडून येतात. 2002 साली ते मगोपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी प्रथम भाजपमध्ये व नंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून 2005सालची पोटनिवडणूक लढविली. तिथेही त्यांनी मोठा विजय प्राप्त केला. 2007, 2012 त्यांनी कॉग्रेसतर्फे निवडणूक लढवून एक हाती विजय मिळवला. 2017 साली मात्र त्यांनी भाजपतर्फे निवडणूक लढविली. तेव्हाही त्यांनी कॉंग्रेसच्या झेवियर फियालो यांच्यावर 8434 मतांनी मोठा विजय प्राप्त केला. यातूनच मडकईकरांचे कुंभारजुवेवर असलेले वर्चस्व प्रतीत होते. पण, यावेळी त्यांचे आरोग्य चांगले नसल्यामुळे त्यांची पत्नी जेनिता यांना उमेदवारी दिली आहे. (Pandurang Madkaikar's position in danger in cumbarjua for goa election 2022)

Pandurang Madkaikar
चर्चा रिकाम्या खुर्च्यांची! खरी कुजबूज...

मडकईकरांच्या प्रभूत्वाची जेनिताला सर येऊ शकत नाही. तरी त्या जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्यांच्या पुढे कॉग्रेसचे राजेश फळदेसाई व तृणमूलचे (Goa TMC) समील वळवईकर यांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे. हे दोघे एकाच नाण्याची दोन बाजू असल्यामुळे लढतीत चुरस निर्माण झाली आहे. समील वळवईकर हे ही कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार होते. पण कॉंग्रेसने फळदेसाई यांना उमेदवारी दिल्यामुळे सलीलने तृणमूलची कास धरली. हे दोघेजण गेले बरेच दिवस या ना त्या कारणाने प्रकाश झोतात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारालाही गती प्राप्त झाली आहे. खरेतर 1999 नंतर कॉग्रेसला या मतदारसंघात विजय प्राप्त करता आलेला नाही.

99 साली कॉग्रेसच्या (Goa Congress) निर्मला सावंत यांनी भाजपचे गोविंद पर्वतकर यांच्यावर मात करून विजय मिळवला होता. त्यांनतरच्या चार निवडणुकीत कॉंग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. पण, आता राजेश फळदेसाईंच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसमध्ये ‘जान’ आल्यासारखी वाटत आहे.

Pandurang Madkaikar
भाजप सोडून सगळे पक्ष फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड: नड्डांचा घराणेशाहीवर हल्लाबोल

तृणमूलची कुंभारजुवेत (Cumbarjua) स्वतःची अशी शक्ती नाही. त्यामुळे वळवईकरांना स्वतःच्या शक्तीवर निवडणूक लढवावी लागत आहे. आता या दोघांच्या लढतीत भाजपचा फायदा होऊ शकतो की काय असा ही तर्क व्यक्त होत आहे. पण भाजपचेच एक प्रमुख कार्यकर्ते रोहन हरमलकर यांनी बंड करून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे ते भाजपला ‘अपशकून’ करू शकतात. खरे तर, हरमलकरांबरोबर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक पूत्र सिध्देश हेही उमेदवारीच्या शर्यतीत होते. जेव्हा सिध्देशांना उमेदवारी मिळाली नाही तेव्हा तेही बंड करण्याच्या पावित्र्यात होते. व नंतर त्यांच्या वडलांनी मध्यस्थी केल्याने त्यांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेतली असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचे मडकईकरांबरोबर ‘मनोमिलन’ झाल्याचे दिसत नाही. याचा फटका मडकईकरांना बसू शकतो.

‘आप’चीही बऱ्यापैकी हवा

‘आप’तर्फे (Goa AAP) गोरखनाथ केरकर हे रिंगणात आहेत. आपची मतदारसंघात बऱ्यापैकी ‘हवा’ झाल्यामुळे तसेच केरकर बरेच दिवसांपासून कार्यरत असल्यामुळे चांगली मते प्राप्त करू शकतात असे दिसते आहे. रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे छगन नाईक व गोंयचो स्वाभिमान मारिया वरेला यांनी उमेदवारी दाखल केली आहे. आता ते कोणाची किती मते घेतात हे बघावे लागेल. पण सध्या लढत आहे ती कॉग्रेस भाजप व तृमूलमध्ये.

पतीचा गड जेनिता राखणार?

आपल्या पतीचा गड जेनिता मडकईकर राखू शकतात की नाही हा सध्या कुतूहलाचा विषय झाला आहे. पण, यावेळी मडकईकरांना निवडणूक जड जाणार असे संकेत मिळताहेत. पांडुरंग मडकईकर हे स्वतः प्रचारात सक्रीय नसल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या पत्नीच्या यशावर होऊ शकतो असा तर्क व्यक्त होत आहे. आता हे तर्क-वितर्क खरे होतात की काय जेनिता कुंभारजुवे राखू शकतात की काय कॉग्रेस वा तृणमूल मडकईकरांच्या अभेद्य किल्ल्यात शिरकाव करू शकतात की नाही याची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळणार हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com