गोव्यातील भाजपचे भवितव्य कॅथलिक समुदायाच्या हातात

गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तसेच गोव्याचे राज्यपाल आणि आर्चबिशप यांच्या देखील भेटी वाढल्या आहेत.
Meeting between PM Modi and Pope is considered very important  Assembly elections in Goa
Meeting between PM Modi and Pope is considered very important Assembly elections in GoaDainik Gomantak

गोवा आणि मणिपूरमधील ख्रिश्चन समुदायाच्या बळावर भाजपला आपली व्होट बँक आणखी मजबूत करायची आहे. यासोबतच भाजपला केरळमध्येही आपली ताकद वाढवायची आहे. गोव्यात सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. गोव्यातील भाजप सरकार मोठ मोठे आश्वासन गोमंतकीयांना देत आहेत. मात्र गोव्यातील कॅथलिक समाज कुणाच्या बाजूने असणार यावर गोवा विधानसभा निवडणुकीचे फासे पलटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांची भेट भाजपसाठी मोठी आणि ऐतिहासिक भेट असल्याचे वर्णन केले जात आहे, तर आरएसएसने 'वसुधैव कुटुंबकम'वर आमचा विश्वास असल्याचे म्हटले आहे.

गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. गोवा आणि मणिपूरमधील ख्रिश्चन समुदायाच्या बळावर भाजप पक्षाला आपली व्होट बँक आणखी मजबूत करायची आहे. यासोबतच भाजपला केरळमध्येही आपली ताकद वाढवायची आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोप फ्रान्सिस यांच्यासोबतची एक तासाची बैठक आणि पोपचे भारतभेटीचे निमंत्रण हे भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

Meeting between PM Modi and Pope is considered very important  Assembly elections in Goa
घराणेशाहीचा प्रश्‍‍न राष्‍ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना घेरू लागतो तेव्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर, ख्रिश्चन समुदायामध्ये चिंतेच्या चर्चाही रंगल्या आहेत. चर्चमधील अनेक प्रभावशाली रोमन कॅथलिक मंडळींनी भाजपसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून केरळमध्ये दोन्ही पक्षांमध्ये चर्चाही सुरू झाली आहे.

पंतप्रधानांनी 30 ऑक्टोबर रोजी पोप यांच्या सोबत घेतलेल्या भेटीचे चर्चने स्वागत केले आहे. सिरो-मालंकारा कॅथोलिक चर्चचे मुख्य बिशप कार्डिनल बॅसिलिओस क्लेमिस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप यांना भारत भेटीचे निमंत्रण दिल्याने आम्ही सर्वजण खूप उत्साहित आणि आनंदी आहोत. साधारणपणे, भारतातील ख्रिश्चन समुदाय पोपच्या भारतात, विशेषतः केरळमध्ये येण्याची वाट पाहत आहे."

"या बैठकीकडे केवळ दोन देशांच्या प्रमुखांमधील बैठक म्हणून पाहिले जाऊ नये. त्याऐवजी, सर्वात मोठ्या लोकशाहीचा नेता आणि प्राचीन संस्कृतीचा प्रमुख आणि मोठ्या धार्मिक समुदायाचा प्रमुख यांच्यातील वाढता संबंध म्हणून याकडे पाहिले पाहिजे," असे उद्गार क्लेमिस यांनी काढले होते. 'या भेटीमुळे विविध धार्मिक गटांच्या लोकांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्याटी भावना निर्माण होईल. आणि त्यातून भारतात सकारात्मक प्रयत्न होतील. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत की त्यांनी पोपच्या भारत भेटीचा मार्ग खुला केला आहे.," असेही क्लेमिस म्हणाले.

आता गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई हे मूळ केरळचे आहेत. ते हिंदू असले तरी ख्रिश्चन धर्मियांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांचे धर्मगुरूंशी जवळचे संबंध आहेत. पहिल्यांदाच दोन विरोधी विचारधारा असणाऱ्या पंथांचे बिशप राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्यात एकत्र आले होते. यावेळी किट्टयामच्या कोबाईट सिरेन चर्चचे बिशप थॉमस तिमोथीओस, तसेच बिशप जी वर्गीस जुलियस उपस्थित होते. याबरोबरच केरळमधील अनेक चर्चचे फादरही या सोहळ्याला उपस्थित होते.

Meeting between PM Modi and Pope is considered very important  Assembly elections in Goa
गोव्यातील तीन बायका, फडणवीसांची फजिती ऐका...

सध्या गोव्यात भाजपमध्ये 15 ख्रिस्ती आमदार आहेत. त्यापैकी पणजीचे आमदार आतानासिओ मोन्सेरात व कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत चांगले संबध आहेत. गोवा निवडणुकीत चर्चची भूमिका खूप महत्वाची मानली जाते. निवडणुकीआधी मतदार जागृती व मतदार साक्षरता हे चर्च आपले कर्तव्य मानते. त्यामुळे प्रार्थनासभांतून मार्गदर्शन केले जाते. त्यातून मतदाररुपी भाविकांना मतदानाची नेमकी दिशा ठरवण्यास मदत होत असते. त्यामुळे गोवा राज्याच्या राजकारणात तशी चर्चची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. गोव्याचे राज्यपाल आणि आर्चबिशप यांच्या अलीकडे वारंवार होऊ लागलेल्या भेटी सध्या गोव्यात चर्चेच्या ठरू लागल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com