वास्को: आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या सोबत नाही. आमदार (MLA) आल्मेदा भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते असून मी अखिल भारतीय काँग्रेस समिती - गोवा प्रदेश काँग्रेस समितीचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याची प्रतिक्रिया वास्कोचे युवा काँग्रेस नेते नंदादीप राऊत यांनी दिली. वास्कोचे आमदार आल्मेदा यांनी राजकीय स्वार्थासाठी उपयोग करू नये. आल्मेदा माझे चांगले मित्र असले तरी राजकीय पातळीवर मी काँग्रेस कार्यकर्ता असल्याची माहिती मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी दिली.
वास्को येथील एका कार्यक्रमात वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा (Carlos Almeida) यांनी काँग्रेसचे नेते नंदादीप राऊत माझे चांगले मित्र असलेल्याचा आपल्या भाषणातून सांगितले होते यामुळे राजकीय पातळीवर वास्कोत भाजप व काँग्रेस (congress) मध्ये पुन्हा शीतयुद्ध सुरू झाले आहे.
वास्कोचे युवा काँग्रेस नेते नंदादिप राऊत यांनी सांगितले की, आमदार आल्मेदा यांनी एका कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की माजी नगरसेवक नंदादीप राऊत याने काँग्रेस पक्षात प्रवेश केला असला तरी तो माझ्या सोबत आहे. मी ठामपणे सांगू इच्छितो माजी आमदार आल्मेदा सोबत मैत्री असली तरी आल्मेदा भाजपचे नेते आहेत.
सोबत कोणताही राजकीय (political) संबंध नसल्याची माहिती माजी नगरसेवक राऊत यांनी दिली. तसेच आमदार आल्मेदा यांचे कार्यकर्ते सुद्धा माझ्या नावाचा गैरमार्गाने उपयोग करीत असल्याने आमदार आल्मेदा यांनी राजकीय फायद्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करू नये अशी माहिती माहिती राऊत यांनी दिली.
वास्कोचे आमदार आल्मेदा यांनी गोवा प्रदेश काँग्रेस पक्षात येण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याने ते सध्या माझ्या नावाचा उपयोग आपली राजकीय कारकीर्द सांभाळण्यासाठी घेत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. गेली वीस वर्षे मी प्रामाणिकपणे आमदार यांच्यासोबत कार्य केले होते. पण गेले एक वर्ष मी त्यांच्यासोबत नसल्याने कदाचित त्याने माझ्या नावाचा उपयोग केला असेल अशी माहिती राऊत यांनी दिली. गेल्या दहा वर्षात वास्कोचा विकास झाला नाही. सत्ताधारी पक्षात राहून सुद्धा आमदार आल्मेदा पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता असून माझी जबाबदारी मी पूर्ण इमानदारीने सांभाळणार असल्याची माहिती शेवटी युवा काँग्रेस नेते नंदादिप राऊत (Nandadeep Raut) यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.