गोव्यातील नेते, मंत्र्यांना कोविडचा विसर! नियम न पाळता गाजवतायेत सभा

गोव्यात दिसत असलेल्या या सगळ्या चित्रावरून आरोग्य प्रशासनाच्या कामात आणखी भर पडणार असेच दिसत आहे.
गोव्यातील नेते, मंत्र्यांना कोविडचा विसर! नियम न पाळता गाजवतायेत सभा

गोव्यातील नेते, मंत्र्यांना कोविडचा विसर! नियम न पाळता गाजवतायेत सभा

Dainik Gomantak

Published on
Updated on

पी. चिदंबरम, अमित शाह, जेपी नड्डा, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, महुआ मोइत्रा, मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेते गेल्या दोन महिन्यांपासून गोवा दौऱ्यावर राहून 2022 च्या निवडणुकीची (Goa Election) तयारी करत आहेत. ओमिक्रॉन व्हायरस (Omicron Variant) असूनही कोविड 19 (Covid-19) मार्गदर्शक तत्त्वे आणि फेसमास्कचे (Mask) उल्लंघन करून पक्षाच्या राजकारण्यांनी (Politics) भारतात निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक कार्यक्रम सुरू केले आहेत.

इतर राज्यांप्रमाणेच गोव्याची आगामी विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) या पक्षांसाठी महत्वाची आहे. मात्र पक्षाला आणि आणि पक्षातील नेत्यांना कोरोनाचा विसर पडलेला दिसत आहे. प्रचार आणि सभा संमेलनामध्ये कोरोना नियमांना धाब्यावर मारलेले दिसत आहे. विना मास्क गोव्यात सर्वत्र प्रचार करणे सुरू झाले आहे. कोरोनाचा विसर पडून गोव्यात राजकीय पक्षांच्या प्रचाराला ऊत आला आहे.

गोव्यात बुधवारी 52 नवीन कोविड संसर्गाची प्रकरणे आढळली आहे. यात एकही कोविड मृत्यू झाला नाही. 1 ऑक्टोबरपासून अडीच महिन्यांपर्यंत नवीन संक्रमण संख्या 100 च्या खाली राहीली आहे. गेल्या आठवड्यात सक्रिय प्रकरणांची संख्या 391 आहे आणि या 50 दिवसांत 500 पेक्षा कमी कोविड रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच काल गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचा(covid-19) नवा व्हेरिएंन्ट ओमिक्रॉनचा (omicron variant) संशयित आढळला होता ज्याच्या रिपोर्ट आतपर्यंत आलेला नाही. तो मुलगा 13 वर्षांचा असून मंगळवारी गोवा विमानतळावर (Goa Airport) ते यूकेहून (UK) आला होता.

<div class="paragraphs"><p>गोव्यातील नेते, मंत्र्यांना कोविडचा विसर! नियम न पाळता गाजवतायेत सभा</p></div>
रोहन खंवटेंना BJPमध्ये घेण्यासाठी मनोहर पर्रीकरही होते उत्सुक

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार वाढत असताना पहिले चार्टड विमान गोव्यात दाखल झाले आहे. आणि यामुळे नकळत का होईना गोवेकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. यातच कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचीही जगभरात दहशत वाढत आहे. याच पाश्वभूमीवर काल 159 विदेशी पर्यटकांना घेऊन गोवा पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान "एअर अस्ताना" (Air Astana) हे कझाकिस्तान (Kazakhstan) मधून दाबोळी विमानतळावर (Daboli Airport) दाखल झाले.

कोविड महामारीच्या सावटाखाली " एअर अस्ताना" हे चार्टर अभिमान अलमाटी कझाकिस्तान येथून काल गोव्यात दाखल झाले. यामध्ये 159 विदेशी प्रवाशी होते. या पहिल्या चार्टर विमानातल्या प्रवाशांच्या स्वागतासाठी दाबोळी विमानतळावर खास कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Mavin Gudinho) उपस्थित होते. तसेच दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिकही उपस्थित होते. वाहतूक मंत्र्यांनी अगदी थाटात केक कापून या चार्टर फ्लाईट पर्यटन हंगामाची सुरुवात केली. यावेळी पर्यटकांचे पर्यटन खात्याने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. एवढच नव्हे तर बँड वादनाची सुद्धा खास व्यवस्था करण्यात आली होती.

<div class="paragraphs"><p>गोव्यातील नेते, मंत्र्यांना कोविडचा विसर! नियम न पाळता गाजवतायेत सभा</p></div>
काय झालंय माझ्या ‘आप’ला?

गोव्यात दिसत असलेल्या या सगळ्या चित्रावरून आरोग्य प्रशासनाच्या कामात आणखी भर पडणार असेच दिसत आहे. गोव्यातील पर्यटन हंगाम सुरू झालाय त्यातच गोवा निवडणुकीच्या प्रचारालाही उधाण आले आहे. ख्रिसमस, न्यू इयर हा पुर्ण डिसेंबर महिना गोवा पर्यटन हंगामाचा आहे. राज्यात पर्यटकांची गर्दी तर वाढणारच सोबतच राजकीय नेत्यांचे दौरेही वाढणार आहे. प्रचार, जाहीर सभा आणि रॅलीलाही मोठी गर्दी होणार आहे. तेव्हा निवडणुक आणि गोवा पर्यटन हंगाम कोविडला पुन्हा आमंत्रण देणार का? असा प्रश्न ही परस्थिती बघून उपस्थित होतो आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com