'गोमंतकीयांच्या स्वाभिमानासाठी, ‘आरजी’चा पुढाकार'

आरजीच्या सरकारकडून रोजगार, शेती, उद्योग, कला, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, कायदा सुव्यवस्था अशा सर्वच क्षेत्रात सर्वंकष अशी पॉलिसी ठरवली जाईल
Goa Election: Revolutionary Goans will fight For the self-esteem
Goa Election: Revolutionary Goans will fight For the self-esteemDainik Gomantak

गोमंतकीयांना लाचार नव्हे, तर स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी आरजीचा (Revolutionary Goans) पुढाकार असेल, असे सांगताना आरजीच्या सरकारकडून रोजगार, शेती, उद्योग, कला, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, कायदा सुव्यवस्था अशा सर्वच क्षेत्रात सर्वंकष अशी पॉलिसी ठरवली जाईल, आणि फक्त गोमंतकीयांनाच त्याचा लाभ मिळेल याकडे कटाक्ष ठेवला जाईल, असे रेव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब (Manoj Parab) यांनी तिस्क - फोंडा येथे जमलेल्या जनसमुदायासमोर बोलताना ग्वाही दिली.(Revolutionary Goans will fight For the self-esteem)

तिस्क - फोंडा येथील आगियार मैदानावर काल रेव्होल्युशनरी गोवन्सच्या गोवा सुराज पार्टीच्या बॅनरखाली फोंडा तालुक्यातील प्रियोळ, शिरोडा, मडकई आणि फोंडा या चारही मतदारसंघातील नागरिकांची भव्य जाहीर सभा झाली. त्यावेळेला मनोज परब यांनी आरजीचे सरकार सत्तेवर आल्यास सर्वप्रथम बेकायदा झोपडपट्टी आणि भंगारअड्डे नष्ट करून गोमंतकीयांना हक्काचे घर देऊ असे वचन दिले. गोवा विधानसभेतील आमदारांनी फक्त स्वतःची तुंबडी भरली, आता गोमंतकीयांना स्वाभिमानाने जगण्यासाठी आरजीचा पुढाकार असेल, असे मनोज परब म्हणाले.

मनोज परब म्हणाले, फोंडा तालुक्यासह सर्वच मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी गोवा विकायला काढला आहे. गोमंतकीयांना जगणे मुश्कील ठरले आहे. बिगर गोमंतकीयांचे वाढते प्रस्थ गोमंतकीयांच्या मुळावर येत आहे, त्यामुळेच गोमंतकीयांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देताना सरकारात शंभर टक्के रोजगार आणि खाजगी उद्योग क्षेत्रात ऐशी टक्के रोजगार उपलब्ध केला जाईल, असे सांगितले आहे.

Goa Election: Revolutionary Goans will fight For the self-esteem
भाजपने उमेदवारी नाकारल्यास उत्पल यांच्या प्रमाणे कठोर निर्णय घ्यावा लागेल: आल्मेदा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com