Goa Election 2022: गोव्याचं राजकारण गाजल देशभर

गेल्या पाच वर्षांत चतुर्थांश गोव्याच्या आमदारांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा तर, तब्बल 70 टक्के आमदारांनी बदलला पक्ष
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Election 2022: गोव्याचे राजकारण सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. राजकारणाच्या बाबतीत राज्याने अभूतपूर्व राष्ट्रीय विक्रम रचला असून गेल्या पाच वर्षांत चतुर्थांश आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर तब्बल 70 टक्के आमदारांनी पक्ष बदलला आहे.

Goa Assembly Election 2022
TMC: काँग्रेसचे व्हिक्टर गोन्साल्विस झाले तृणमूलवासी!

मतदानाला अजून एक महिना बाकी असल्याने ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या (Goa Assembly Election) धावपळीत, वेगळ्या चिन्हावर लढण्यासाठी 11 आमदारांनी आपापल्या पक्षांचे राजीनामे देऊन इतर राजकीय पक्षांमध्ये (Political Party) प्रवेश केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 40 सदस्यांच्या सभागृहात आज केवळ 29 आमदार उरले आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) एकमेव आमदार चर्चिल आलेमाओ यांनी राजीनामा दिला नाही तर, स्वतःला टीएमसीमध्ये विलीन केले. गेल्या पाच वर्षांत या विधानसभेत तब्बल 27 आमदारांनी पक्षांतर केले. 10 काँग्रेस आणि 2 एमजीपी आमदारांनी भाजपमध्ये विलीन केले तर चर्चिल यांनी टीएमसीमध्ये विलीन केले. विश्वजित राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी कार्यकाळाच्या सुरुवातीलाच भाजपच्या (Goa BJP) चिन्हावर पुन्हा निवडून येण्यासाठी काँग्रेसचा राजीनामा दिला. विधानसभेच्या कार्यकाळाच्या शेवटी आमदारपदाचा राजीनामा दिलेल्या 11 पैकी 4 भाजप, 3 कॉंग्रेस, 2 TMC आणि MGP आणि AAP मध्ये प्रत्येकी एक सामील झाले आहेत.

Goa Assembly Election 2022
BJP Candidate: भाजपची उमेदवार यादी 16 जानेवारीला जाहीर होणार : मुख्यमंत्री

अपक्ष आमदारांची गोव्याच्या राजकारणात भूमिका महत्त्वाची

अपक्ष आमदारांनीही गोव्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 1989 मध्ये मडगावातून अनंत उर्फ बाबू नायक हे ‘मगोप’चा पाठिंबा घेऊन अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी उतारवयात सुद्धा त्यावेळची विधानसभा गाजविली होती. ती त्यांची शेवटची निवडणूक (Election) ही ठरली होती.1994 साली तीन आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते. सांताक्रुझमधून व्हिक्टोरिया फर्नांडिस (मामी) वेळ्ळीतून मानुएल फेर्नांडिस व मुरगावातून जॉन वाझ हे अपक्ष आमदार विधानसभेत दिसले होते. यापैकी मामींनी अनेक प्रश्नांवरून रान उठवित विधानसभा गाजविली होती. तसेच, एका घराण्यात दोघांना उमेदवारी देऊ नये, असा कॉंग्रेसपक्षाचा नियम असल्यामुळे प्रतापसिंह राणेंचे पुत्र विश्वजीतांनी आपली पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. नंतर त्यांनी कॉंग्रेसमधून प्रवेश करून पोटनिवडणुकीतही विजय संपादन केला होता.

या निवडणुकीबाबत...

या निवडणुकीत पक्षांची ‘भाऊगर्दी’ होणार असल्यामुळे अपक्षांना संधी मिळू शकते अपक्ष उमेदवार होण्याचे फायदे तसे तोटेही आहेत. इतर पक्षाचे नाराज कार्यकर्ते आपले वजन अपक्षाच्या पारड्यात टाकू शकतात हा एक फायदा झाला. पण अपक्षाला संपूर्ण मोर्चेबांधणी स्वबळावर करावी लागते आणि त्यातून कधीकधी त्याची दमछाकही होऊ शकते. असे असूनही अपक्षांचे महत्त्व दुर्लक्ष करता येणे शक्यच नाही. आता यावेळी किती अपक्ष बाजी मारतात आणि ते पुढील विधानसभेत कोणता ‘रंग’ दाखवतात. याचे उत्तर येणारा काळच देणार आहे हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com