डिचोली मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

साखळीत मुख्यमंत्र्यांची विजयाची हॅटट्रिक, मये मतदारसंघात ‘फॉर्मुला’ यशस्वी
Goa Election 2022 Bicholim Result
Goa Election 2022 Bicholim ResultDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : भाजपसाठी सुरक्षित म्हणून ओळखण्यात येणाऱ्या डिचोली तालुक्यात पक्षाच्‍या वर्चस्वाला यावेळी किंचित तडा जाताना एक मतदारसंघ भाजपच्या हातातून निसटला आहे. 2012 सालची पुनरावृत्ती होताना तालुक्यातील डिचोली मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात भाजपला पराभव सहन करावा लागला असून, यावेळी भाजपच्या मतांच्या टक्केवारीतही प्रचंड घट झाली आहे. यावेळी डिचोलीत भाजपच्या मतांनी जवळपास 5 हजारांची घट आली आहे. (Goa Election 2022 Bicholim Result News Updates)

Goa Election 2022 Bicholim Result
बाबूशची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून मनधरणी

2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) पूर्ण डिचोली तालुक्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. डिचोलीसह साखळी आणि मयेत मिळून तिन्ही मतदारसंघात भाजपचे ‘कमळ’ फुलले होते, तर त्यापूर्वी 2012 साली झालेल्या निवडणुकीत तालुक्यातील साखळी आणि मये मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला होता. डिचोलीतून अपक्ष उमेदवार नरेश सावळ निवडून आले होते. यावेळीही तीच पुनरावृत्ती होताना डिचोलीत अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये वरचढ ठरले आहेत. या निवडणुकीत राजकीय तज्ज्ञासह सर्वांचे लक्ष तालुक्यातील साखळी मतदारसंघाकडे लागले होते. या मतदारसंघातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी निवडणूक लढविली होती. या मतदारसंघातील चित्र शेवटच्या क्षणापर्यंत अस्पष्ट होते. मात्र, अनेकांचे अंदाज खोटे ठरले आहेत. या मतदारसंघातून मुख्यमंत्री डॉ. सावंत केवळ निवडूनच आले नाहीत. तर त्यांनी विजयी ‘हॅट्‌ट्रिक’ संपादन केली आहे.

2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने खेळी खेळताना शेवटच्या क्षणी तत्कालीन आमदार अनंत शेट यांना उमेदवारी डावलून प्रवीण झांट्ये यांना उमेदवार म्हणून पुढे केले होते. भाजपची ती खेळी यशस्वीही झाली होती. यावेळीही भाजपने तीच खेळी खेळली होती. प्रवीण झांट्ये यांच्याऐवजी प्रेमेंद्र शेट यांना उमेदवारी दिली होती. भाजपचा हा डाव पुन्हा यशस्वी ठरताना प्रेमेंद्र शेट हे निवडून आले आहेत. या मतदारसंघात सलग चारवेळा मिळून आतापर्यंत पाचवेळा भाजपने आपला झेंडा फडकावला आहे.

Goa Election 2022 Bicholim Result
भाजप कार्यकर्त्यांकडून विरोधी प्रचार, तरीही जिंकलोच : बाबूश मोन्सेरात

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येणाऱ्या डिचोली मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपच्या वर्चस्वाला तडा गेला आहे. या मतदारसंघातून सभापती राजेश पाटणेकर हे तीनवेळा भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. मात्र, यावेळी मतदारांनी त्यांना नाकारले आहे. २०१२ साली झालेल्या निवडणुकीची (Goa Election) पुनरावृत्ती होताना यावेळीही या मतदारसंघात अपक्षाने बाजी मारली आहे. २०१२ साली डिचोलीतून नरेश सावळ हे अपक्ष म्हणून निवडून आले होते तर यंदाच्या निवडणुकीत डॉ. चंद्रकांत शेट्ये हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.

डिचोली आणि मये मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या माजी आमदारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. डिचोलीतून निवडणूक लढविलेले सभापती राजेश पाटणेकर यांच्यासह माजी आमदार नरेश सावळ तसेच मयेतून निवडणूक लढविलेले माजी आमदार प्रवीण झांट्ये यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com