Goa: प्रियोळ मतदारसंघात मागील पाच वर्षात नेमकेपणाने विकास झालेला नाही. रस्ते, वीज, पाणी समस्या कायम आहेत. रोजगारांचा प्रश्न सुटलेला नाही. तो सोडविणे गरजेचे आहे, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी म्हार्दोळ येथे जनसंपर्क यात्रेवेळी सांगितले.
म्हार्दोळ परिसरात दीपक ढवळीकरांनी मगो (MGP) पक्षातर्फे जनसंपर्क यात्रा काढली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, माजी जिल्हा सदस्य शिवदास गावडे, तिवरे वरगाव पंचायतीचे पंच सदस्य फ्रन्सिस लोबो, सिध्दार्थ गाड, भोम पंचायतीचे पंच विश्वजित नाईक, माजी पंच पुष्पा गावडे, माजी पंच हरिचंद्र जल्मी, पंच राजू नाईक, भारत जल्मी, मधू गावकर, संजय सावंत उपस्थित होते.
विकासासाठी पाठिंबा
भोम पंचायत क्षेत्रात दीपक ढवळीकर यांच्या कार्यकाळात रस्ते, वीज, पाणी समस्येसंदर्भात खूपच चांगली कामे झाली. सर्वसामान्यांच्या विकासासाठी ढवळीकरांनी कार्य केले. युवकांसाठी प्रोत्साहनपर उपक्रम राबविले. गरजूंना मदत केली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी माझा त्यांना पाठिंबा असून ग्रामस्थांनीही सहकार्य करावे, असे आवाहन भोमचे पंच विश्वजित नाईक यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.