भाजपने डावलल्यानंतर PWD मंत्र्यांनी केली अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा

भाजप पक्षाने तिकीट नाकारल्याने भाजपच्या तीन नेत्यांनी आगामी गोवा विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आहे.
 Laxmikant Parsekar, Savitri Kavlekar, and Deepak Pauskar
Laxmikant Parsekar, Savitri Kavlekar, and Deepak PauskarDainik Gomantak

14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्याने सावध होऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊस्कर (Deepak Pauskar) आणि उपसभापती आमदार इसिडोर फर्नांडिस यांनी भाजपविरोधात (BJP) लढण्याचा निर्णय घेतला आहे. फर्नांडिस यांनी आमदारकीचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा काल गुरवारी दिला.

 Laxmikant Parsekar, Savitri Kavlekar, and Deepak Pauskar
गोव्यात 'आलेमाव-गेलेमाव' संस्कृती संपवण्यासाठी शिवसेनाच हवी

पाऊस्कर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, तर फर्नांडिस आज त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत. “भाजप विधानसभा निवडणुकीत एकही आकडा पार करू शकणार करणार नाही. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असून शुक्रवारपासून घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात करणार आहे. मला विश्वास आहे की मी निवडणूक जिंकेन आणि सावर्डेच्या लोकांसाठी काम करेन,” असे मत पाऊस्करांनी काल राजीनामा दिल्यानंतर व्यक्त केले.

"भाजपने (BJP) सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मला कधीच काम करू दिले नाही. मला पीडब्ल्यूडी पोर्टफोलिओ देण्यात आला कारण मी भाजपचे सरकार वाचवले होते भाजप पक्षाने वर्षभरापूर्वीच त्यांना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय घेतल्याचा" आरोप करत यामागे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचा हात असल्याचा दावा पाऊस्करांनी केला. त्याचबरोबर माल जाणीवपूर्वक डावलण्यात आले असून या निर्णयाविरुद्ध माझ्या कार्यकर्त्यांनी मला अपक्ष निवडणूक लढविण्याचा (Goa Election 2022) आग्रह केला. कार्यकर्त्यांचा निर्णय सर्वोच्च मानून भाजपच्या महिला मोर्चा उपाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) यांनी सांगे येथील गुरुकुल सभागृहात काल पत्रकार परिषदेत केली.

 Laxmikant Parsekar, Savitri Kavlekar, and Deepak Pauskar
भाजप कोणत्याही परिस्थितीत गोव्यात सत्तेत येत नाही, लिहून घ्या : राऊत

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेही भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या विचारात आहेत. काल गुरुवारी, भाजपने 40 विधानसभा मतदारसंघांपैकी 34 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. आणि आज शिवसेनेनेही आपल्या नऊ उमेदवारंची यादी जाहीर केली आहे. गोवा विधानसभेची निवडणूक 14 फेब्रुवारीला होणार असून 10 मार्चला निकाल लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com