फातोर्डा, मडगावात रंगणार अटीतटीच्या लढती

तृणमूल आणि आपचे वाढते प्राबल्य, गोवा फॉरवर्डसाठी चिंता
Damu Naik Digambar kamat and Vijay Sardesai Political Fight in Goa
Damu Naik Digambar kamat and Vijay Sardesai Political Fight in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : काही प्रमाणात असलेल्या भाजपविरोधी लाटेमुळे 2017 च्या निवडणुकीत मडगावातून काँग्रेसचे दिगंबर कामत आणि फातोर्ड्यातून गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई विनासायास जिंकून आले होते. मात्र, यंदाच्या 2022 च्या निवडणुकीत परिस्थिती काही प्रमाणात बदललेली आहे. या दोन्ही मतदारसंघात यावेळी अटीतटीच्या लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अन्य पक्षाकडून भाजपविरोधी मतांची विभागणी असल्याचे सांगितले जात आहे. (Political Fight in Goa News Updates)

Damu Naik Digambar kamat and Vijay Sardesai Political Fight in Goa
'फोंडा गोव्यातील तिसरा जिल्हा बनवणार' : रवी नाईक

आतापर्यंत आठ वेळा मडगावातून निवडून आलेले काँग्रेसचे (Congress) दिगंबर कामत हे प्रत्येक वेळी भाजपात असलेल्या फुटीचा फायदा उठवत सहज जिंकून येत होते. मात्र, यंदा भाजपने आपल्या नेहमीच्या उमेदवारांना रिंगणात न उतरवता पेडण्यात डोईजड झालेले उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना मडगावात उतरविल्याने पहिल्यांदाच कामत यांना तगड्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. दुसऱ्या बाजूने फातोर्ड्यात विजय सरदेसाई यांच्या विरोधात भाजपचे दामू नाईक निवडून यावेत, यासाठी भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे.

मडगावात दिगंबर कामत आणि बाबू आजगावकर यांच्या व्यतिरिक्त तृणमूलचे महेश आमोणकर, आपचे लिंकन व्हाझ आणि आरजीचे शशिराज शिरोडकर असे पाच उमेदवार रिंगणात उभे आहेत.

Damu Naik Digambar kamat and Vijay Sardesai Political Fight in Goa
गोंयकार काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेत : चोडणकर

दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या प्रत्येक निवडणुकीत झोपडपट्टी मते निर्णायक भूमिका पार पाडत असे. तिथे भाजपला शिरकावही नसे. मात्र, यंदा बाबू आजगावकर हे मैदानात उभे असल्याने ही झोपडपट्टी मते दोघांमध्येही विभागून जाऊ शकतात. असे जरी असले तरी यावेळी भाजपने बिगर सारस्वत उमेदवार दिल्याने सारस्वत मतदार भाजपपासून दूर जाऊन त्याचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो.

यावेळी रिंगणात उभे असलेले तृणमूलचे महेश आमोणकर हे तिसरे उमेदवार काँग्रेससाठी मारक ठरण्याची शक्यता आहे. आमोणकर हे खरे तर पूर्वीचे कामत यांचेच कार्यकर्ते. मात्र मागच्या निवडणुकीत कामत गटाकडून आपल्याला नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही, या रागाने ते दिगंबर यांच्यापासून दूर झाले. आमोणकर यांचा खारेबांध या एकेकाळच्या दिगंबर कामत यांचा बालेकिल्ला असलेल्या भागात बऱ्यापैकी प्रभाव असून, या भागात तो कामत यांची मते खाऊ शकतो.

दुसऱ्या बाजूने फातोर्ड्यातही गोवा फॉरवर्ड (Goa Forward Party) आणि काँग्रेस युती झाल्याने फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी आपचे संदेश तेलेकर आणि तृणमूलच्या सेऊला व्हाझ हे दोन उमेदवार उभे असल्याने भाजपविरोधी मते या तीन उमेदवारामध्ये विभागून जाण्याची शक्यता आहे.

Damu Naik Digambar kamat and Vijay Sardesai Political Fight in Goa
मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत नाहीत, अंगणवाडी सेविका आक्रमक

ख्रिस्ती, एसटी समाजाच्या मतांकडे लक्ष!

2017 च्या निवडणुकीत आपच्या उमेदवाराने फातोर्ड्यातून रणजित कारवाल्हो यांनी 1500 च्या आसपास मते घेतल्याने सरदेसाई यांची आघाडी 1400 च्या आसपास आली होती. त्यावेळी त्यांना उच्चभ्रू ख्रिस्ती मतदारांची मते मिळाली होती. यावेळी आपने हिंदू उमेदवार उभा केला असला तरी तृणमूलने सेऊला व्हाझ या व्यवसायाने वकील असलेल्या तरुणीला रिंगणात उतरविल्याने हे दोन्ही उमेदवार किती मते काढतात त्यावर फातोर्डा विजयचा होणार की दामूचा हे चित्र स्पष्ट होणार आहे. कामील बार्रेटो आणि पीएदाद नोरोन्हा एसटीची किती मते भाजपच्या बाजूने फिरवू शकतात त्यावरही निवडणुकीचा निकाल बराच अवलंबून असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com