Goa Election 2022: नीलेश काब्राल राखणार का कुडचडेचा गड ?

नीलेश काब्राल (Nilesh Cabral) हे कुडचडेचे विद्यमान आमदार. सध्या ते वीज मंत्री असल्यामुळे त्यांची शक्ती वाढल्यासारखी झाली आहे. 2012 आणि 2017 साली त्यांनी तत्कालीन आमदार शाम सातार्डेकर यांचा पराभव केला.
Nilesh Cabral
Nilesh CabralDainik Gomantak
Published on
Updated on

कुडचडे हा सावर्डेच्या नजीकचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कुडचडे नगरपालिका असल्यामुळे त्याला शहरी मतदारसंघ म्हणता येतो. नीलेश काब्राल हे कुडचडेचे विद्यमान आमदार. सध्या ते वीज मंत्री असल्यामुळे त्यांची शक्ती वाढल्यासारखी झाली आहे. 2012 आणि 2017 साली त्यांनी तत्कालीन आमदार शाम सातार्डेकर (Sham Satardekar) यांचा पराभव केला. (Curchorem Constituency Has Caught The Attention Of Voters In The State)

वास्तवीक काब्राल (Nilesh Cabral) एकेकाळचे सातार्डेकरांचे सहकारी. पण 2012 साली त्यांनी सातार्डेकरांना पराभवाचे पाणी पाजले. आणि 2017 साली त्याची पुनरावृत्ती केली. यावेळी त्यांनी तब्बल 9000 च्या मताधिक्क्याने विजय प्राप्त केला होता. कुडचडे हा मतदारसंघ (Curchorem Constituency) पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. डॉमनिक फर्नांडिस हे पूर्वी त्या मतदारसंघातून निवडून येत असे. पण 1999 साली भाजपच्या रामराव देसाई यांनी कॉंग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला. आणि तेव्हापासून भाजप राज्य सुरू झाले पण 2007 साली कॉंग्रेसच्या (Congress) शाम सातार्डेकरांनी विजय मिळविल्यामुळे भाजपची (BJP) विजयाची परंपरा थोडी खंडित झाली. असे असले तरी हा विजय भाजपाकरिता ‘मध्यांत’ सारखा ठरला. कॉंग्रेसच्या अमित पाटकरांना माजी आमदार शाम सातार्डेकर यांचा पाठिंबा असून तेही सध्या पाटकरांबरोबर फिरताना दिसत आहेत.

Nilesh Cabral
Goa Election 2022: देशातील सामाजिक वातावरण भाजप सरकारने बिघडविले

आपतर्फे गाब्रियल फर्नांडिस हे रिंगणात असून मगोतर्फे विठोबा प्रभुदेसाई यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मगोपचा उमेदवार हा तसा नाममात्र वाटत असल्यामुळे त्याचा निकालावर परिणाम होईल असे वाटत नाही. आपने राज्यात हवा निर्माण केली असून त्याचा फर्नांडिस किती लाभ उठवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अजय बोयर हे अपक्ष म्हणून रिंगणात असून ते किती मते घेतात, हे सांगणे कठीण आहे. सध्या तरी हा काब्रालच्या प्रतिष्ठेचा विषय असून कुडचडे जिंकणे हे त्यांच्या दृष्टीने ‘जिंकू किंवा मरू’ एवढे महत्त्वाचे ठरणार आहे.

कुडचडेचा अंदाज घेतला असता सध्या तरी काब्राल पाण्यात असल्याचे दिसत असले तरी निर्णायक क्षणी ते बाजी उलटवू शकतात, असा रंग दिसत आहे. राज्यभर असलेली भाजपविरोधी लाट कुडचडेत थोपवतात, का यावरही काब्रालचे यश-अपयश अवलंबून आहे. सध्या तरी ही भाजप व कॉंग्रेसमध्येच लढत असून आप व मगोप किती मते घेतात यावरही या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे यशापयश विसंबून असणार आहे. कुडचडेत काब्राल ‘हॅटट्रीक’ करतात की कॉग्रेस 2007 मध्ये मिळवलेल्या विजयाची पुनरावृत्ती करते, याचे उत्तर काळाच्या उदरात दडले आहे.

Nilesh Cabral
Goa Election 2022: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची 'शिवगर्जना'

काब्राल वीजदर, संपत्तीवरून आरोपीच्या पिंजऱ्यात !

2012 साली काब्रालने परत भाजपची मुहूर्तमेढ कुडचडेत रोवली. काब्राल यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा मतदारांशी असलेला संपर्क. त्यामुळेच ते कुडचडेत लोकप्रिय आहेत. तरीसुध्दा त्यांच्यावर अनेक आरोपही होत आहेत. त्यांनी बरीच संपत्ती कमावली,असेही म्हटली जात आहे. विरोधक याचे भांडवल करताना दिसताहेत.अर्थात काब्रालही या आरोपांचे खंडन करून उत्तरे देताना दिसताहेत. आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्याशी झालेली वीज दरासंबंधी ‘डिबेट’ काही महिन्यांपूर्वी बरीच गाजली होती. विजेच्या पुरवठ्याबद्दल तसेच दराबद्दल ही काब्रालांना आरोपीच्या पिंजऱ्यात बसवले जात आहे. सध्या त्यांना कॉंग्रेसच्या अमित पाटकर यांच्याशी ‘झुंज’ द्यावी लागत आहे.

पाटकरांची ‘पाटी कोरी’ हीच जमेची बाब !

अमित पाटकर यांना तशी मोठी राजकीय पार्श्वभूमी नसली तरी ‘पाटी कोरी’ असणे हीच त्यांची जमेची बाजू ठरत आहे. ही जमेची बाजू घेऊन ते काब्राल यांच्यासारख्या अनुभवी अन् मुरब्बी राजकारण्याशी दोन हात करायला पुढे सरसावले आहेत. कुडचडेत कॉंग्रेसची पारंपरिक मतपेढी असल्यामुळे त्याचाही त्यांना लाभ होऊ शकतो. पण तो फायदा काब्रालना शह देण्याएवढा पुरेसा ठरतो, का हे बघावे लागेल.

मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com