प्रियोळ मतदारसंघात 'बॅनर वॉर'

प्रियोळ मतदारसंघातक (Priyol Constitunecy)) बॅनर युद्ध सुरू झाले असून गेल्या दोन महिन्यात अनेक वेळा एकमेकांचे बॅनर फाडण्यात आले.
Banner War

Banner War

Dainik Gomantak

Published on
Updated on

खांडोळा: प्रियोळ मतदारसंघात (Priyol Constitunecy) बॅनर युद्ध सुरू झाले असून गेल्या दोन महिन्यात अनेक वेळा एकमेकांचे बॅनर फाडण्यात आले. रात्री लावलेले बॅनर, सकाळी काढले जातात किंवा पाडले जातात. त्यात संदीप निगळ्ये यांच्या कार्यालयासमोरचे मोठे बॅनर पाडण्यात आले, त्यानंतर गोविंद गावडे, नोनू नाईक व इतरांचेही बॅनर गायब करण्याचा सपाटा सुरू झाला. बॅनर फाडण्याचे, गायब करण्याचे कंत्राट नेमके कोणी घेतले आहे, याचा शोध सुरू झाला असून या बॅनर युद्धामुळे भांडणे, मारामारीच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.

<div class="paragraphs"><p>Banner War</p></div>
'आग्वाद कारागृहाचे' खासगीकरण होऊ देणार नाही; मायकल लोबो

बॅनर कोणाचेही असले तरी ते तयार करण्यासाठी, ते लावण्यासाठीही रक्कम मोजावी लागते. मतदारसंघात हे काम कोणाला तरी दिले जाते. यातून रोजगार मिळतो, पण बॅनरमुळे मतदारसंघातील होणाऱ्या विद्रुपीकरणाकडे कोणीही लक्ष देत नाही. या प्रकाराकडे पंचायतींचेही दुर्लक्ष झाल्यामुळेच कोणीही, कुठेही बॅनर लावतात. त्याबाबत पंचायतींना कर भरला जात नाही. ग्रामसभेत या विषयांवर चर्चा होऊनही कोणीही नेमकेपणाने लक्ष देत नाहीत. खांडोळ्यात महेश काळे यांची गायनाची मैफल होती, त्याच दिवशी रात्री मंत्री गावडे यांच्या विरोधात रात्री बॅनर लावले, ते बॅनर सकाळी समर्थकांनी काढले. त्यात गैर काही नाही. विरोधातील बॅनर ते काढणारच, पण हे बॅनर लावण्याचे उद्योग कोण करतो? याबाबत ग्रामस्थांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. मतदारसंघातील शांतता बिघडविण्याचा हा प्रकार असावा, यासाठी पोलिसांची गस्त ठेवायला हवी, अशी मागणीही मतदारांकडून करण्यात येत आहे.

<div class="paragraphs"><p>Banner War</p></div>
...अन्यथा न्यायालयात जाऊ; गिरीश चोडणकरांचा इशारा

बॅनर कोणी लावले, याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हे प्रकरण आगामी संकटाचेच भाकित करतात. स्वाभिमानी, संस्कारी प्रियोळकरांवर येऊ घातलेले हे संकट जाणकारांनीच रोखायला हवे, असे ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे.

प्लास्टिक कचरा वाढला

चतुर्थी, दसरा, दिवाळीनंतर जत्रोत्सवानिमित्त कोपऱ्या कोपऱ्यावर नेत्यांच्या शुभेच्छा झळकत आहेत. काही ठिकाणी कायम स्वरूपी बॅनरसाठी स्टॅंड आहेत. त्याखाली जुने बॅनर पडलेले आहेत. प्लॅस्टिकच्या (Plastic) फाटक्या बॅनरचा कचराही गटारातून साचत आहे. याकडे स्थानिक पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. वाढत्या कचऱ्यांकडे पर्यावरणप्रेमी (Environmentalist), वादीचेही लक्ष नाही. राजकारण्याच्या वाटेला कसे जाणार? म्हणून सर्वजण गप्पच आहेत. पर्यावरणाचे होणार नुकसान टाळण्यासाठी पंचायतीने विचार करणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ मतदारांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com