गोव्याच्या राजकारणात झळाळणार 'एलिनांचे कर्तृत्व'

एलिना यांची प्रदेश भाजपातील एक्झिट आम आदमी पार्टीसाठी फायद्याची ठरणारी आहे आणि आपचे मनोबल वाढल्यास त्याचा धोका भाजपला आहे.
Alina Saldanha exit from state BJP will be beneficial for Aam Aadmi Party

Alina Saldanha exit from state BJP will be beneficial for Aam Aadmi Party

Dainik Gomantak 

Published on
Updated on

राज्याच्या मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेल्या माजी आमदार एलिना साल्ढाणा यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देणे धक्कादायक आहे. त्याचा फटका भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे बसणार आहे. आधीच महिला कमी संख्येने असलेल्या प्रदेश भाजपाच्या संघटनेत एलिना यांच्यासारख्या बुद्धिमान महिलेने पक्षत्याग करणे म्हणजे भाजप कमकुवत होण्याचे लक्षण होय. एलिना या प्रदेश भाजपच्या धनलक्ष्मीच होत्या, त्यांच्या राजीनाम्याने अल्पसंख्याकही भाजपपासून दूर जाण्याची चिन्हे आहेत. एक लक्षात ठेवायला हवे, काही मतदारसंघात अल्पसंख्याकांचा आजही पगडा आहे आणि अल्पसंख्याकांनी मनावर घेतल्यास राज्यात उलथापालथ घडू शकते. एलिना यांची प्रदेश भाजपातील एक्झिट आम आदमी पार्टीसाठी फायद्याची ठरणारी आहे आणि आपचे मनोबल वाढल्यास त्याचा धोका भाजपला आहे.

<div class="paragraphs"><p>Alina Saldanha exit from state BJP will be beneficial for Aam Aadmi Party</p></div>
2022 मध्ये भाजपच जिंकणार हे निर्विवाद सत्य: रोहन खंवटे

एलिना (Alina Saldanha) यांनी आमदारकी आणि भाजप (BJP) सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर केलेले भाष्य बोलके आहे. त्यांनी भाजप आपली मूळ तत्त्वे विसरत असल्याची जी खंत व्यक्त केली आहे त्याची दखल केंद्रीय पातळीवरून घेण्याची गरज आहे. एलिना या स्वतंत्र विचारसरणीच्या व्यक्तिमत्त्वापैकी एक होय. त्या फक्त गोव्यातच नव्हे तर देश पातळीवर स्वतःला सिद्ध करू शकतात. एलिना फक्त उच्चशिक्षितच नव्हेत तर मानवी मूल्यांचे जतन करणाऱ्या महिला आहेत. संधी मिळाल्यास त्या राज्यसभेत चमकतीलच परंतु आम आदमी पार्टीसाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हुकमी एक्का ठरतील असे वाटते. इतर पक्षांच्या आमदारांची पळवापळवी भाजपद्वारे सुरू असताना एलिना यांना आम आदमी (AAP) पार्टीने आपल्याकडे वळवून मोठा डाव साधला आहे.

एलिना यांचे पती दिवंगत आमदार, मंत्री माथानी साल्ढाणा यांनी त्या राजकारणात मोठी झेप घेतील असे भविष्य वर्तविले होते. स्व. साल्ढाणा हे खासदार लुईझिन फालेरो यांच्यासारखे चळवळ, आंदोलनातले नेते. गोव्यातील सर्व मोठ्या आंदोलनात त्यांचा वाटा होताच, लाठ्या व दगडाचा मारही त्यांनी खाल्लेला आहे.

माथानी यांच्या निधनानंतर भाजप नेते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी एलिना यांना प्रदेश भाजपात प्रवेश मिळवून दिला आणि त्यांना बिनविरोध निवडून आणत एक वेगळी परंपरा देश, विदेशाला घालून दिली होती. एलिना या पर्रीकर सरकारात मंत्री होत्या, त्यांची कामगिरी अत्यंत सरस होती, त्यांनी पर्यावरणविषयक मुद्यांवर आवाज उठवला होता. मुरगाव तालुक्यातील कोळशाचे प्रदूषण, दूषित हवा या मुद्यांवर प्रकाशझोत टाकत एका मोठ्या समस्येला त्यांनी वाचा फोडली होती. त्यावेळी त्यांनी कोळसा प्रदूषणाचा पर्दाफाश केला नसता तर संपूर्ण गोव्याला कोळसा भुकटीचा विळखा पडला असता. अचूक मुद्दे मांडणाऱ्या विधानसभा सदस्यांत एलिना नक्कीच अग्रक्रमी होत्या. 2017च्या निवडणुकीनंतर वास्तवात त्यांना उपमुख्यमंत्रीपद देता आले असते, परंतु भाजपने त्यांच्यावर अन्याय केला. त्यांना मंत्रिपदही दिले नाही, विधानसभा कामकाजाचे दिवस कमी झाल्यामुळे त्यांना बोलण्यासही वाव मिळाला नाही, तेथेच त्यांची घुसमट झाली असावी.

स्त्रीशक्ती देशाच्या भविष्यातील राजकारणाची किल्ली आहे हे आम आदमी पार्टीने जाणले असावे म्हणूनच त्यांनी एलिना यांना वेळीच आपमध्ये नेले आहे. भाजपात स्त्रीशक्तीचा आदर, कदर करणाऱ्या नेत्यांत पर्रीकर यांचा समावेश होता.

<div class="paragraphs"><p>Alina Saldanha exit from state BJP will be beneficial for Aam Aadmi Party</p></div>
'भाजप कार्यकर्त्यांनी कट्टर राष्ट्रीयत्व जपणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षात यावे'

आज प्रदेश भाजपपासून स्त्रीशक्ती दूर जाणार नाही ना अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रदेश भाजपने मनावर घेतले असते तर एलिना यांना रोखता आले असते. त्यांना पक्ष कामकाजातही स्थान देणे शक्य होते, परंतु मूळ भाजपच कोठेतरी हरवत चालला हे अधिक स्पष्ट झाले आहे.

एलिना यांच्याकडे चांगले शब्दकौशल्यही आहे आणि त्यांना येत्या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या व्यासपीठावर स्थान मिळाले तर त्या भाजपची दाणादाण उडवतील.

डिसेंबर 2022 मध्ये जगबुडी होण्याचे संकेत जागतिक पातळीवरून देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुढील सहा महिने नदीलगतची शहरे वाचवण्यासाठी केंद्र, राज्य, जागतिक पातळीवरील संशोधक, राजकीय शक्तींनी हातात हात घालून कामकाज करणे अपेक्षित आहे. स्त्रीशक्ती अशा कामकाजाचा मोठा भाग होणार आहे आणि अशावेळी एलिना यांच्यासारख्या कार्यक्षम महिला नेत्यांना भाजपने गमावणे म्हणजेच प्रदेश भाजपतून संवेदनशिलता हरवणे नव्हे ना? तसे झाल्यास राज्यात पर्यावरण जतनाच्या, प्रदूषणविरोधी कामात जुंपलेल्यांना जागे व्हावेच लागेल. पर्यावरण सांभाळल्यास प्रदूषणावर नियंत्रण येऊ शकते. एलिना साल्ढाणा या देशपातळीवरून अशा कामकाजातील बदलाच्या मोठ्या साक्षीदार होऊ शकतात, त्यांचा आवाज बुलंद होऊ शकतो, त्यांच्या कर्तृत्वाला नवी झळाळी मिळेल अशी आशा आहे.

सुहासिनी प्रभुगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com