काँग्रेसमध्येच परत जाणार: रेजिनाल्ड

आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginald Lawrence) यांनी लोकाग्रहास्तव कॉंग्रेस पक्षात पुर्नप्रवेश करणार असल्याचे आज मडगावी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
Aleixo Reginald Lawrence
Aleixo Reginald LawrenceDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: ओपिनियन पोलच्या अस्मिता दिवसाचा मुहूर्त साधून अवघ्या 28 दिवसात तृणमुलला सोडचिठ्ठी दिलेले कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी लोकाग्रहास्तव कॉंग्रेस पक्षात पुर्नप्रवेश करणार असल्याचे आज मडगावी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. अजून आपण पुर्न प्रवेशासाठी कॉंग्रेस (Congress) नेत्याशी संपर्क साधलेला नाही. पण कॉंग्रेस पक्षात प्रवेश दिलाच तर आपली काँग्रेस उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची तयारी आहे असेही त्यांनी सांगितले. काल रात्री रेजिनाल्ड यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांची भेटही घेतली होती. तृणमुलमध्ये प्रवेश केली ती आपली मोठी चुक होती व आता कॉंग्रेस पक्षात जात आहे ते केवळ लोकाच्या भल्यासाठीच. अशी चुक आपण या पुढे कधीही करणार नसल्याचे रेजिनाल्ड (Aleixo Reginald) यानी सांगून मतदारांची माफीही मागितली. कॉंग्रेसमध्ये राहुन पक्षाचे निष्ठेने व प्रामाणीकपणे कार्य करीन असे रेजिनाल्ड यानी सांगितले.

दरम्यान, केवळ 20 दिवसांतच मी तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress) पक्षाचा अनुभव घेतला. त्यांचा अनागोंदी कारभार पाहिला व हा पक्ष गोवा व गोवेकराच्या भल्यासाठी नसल्याचे प्रचिती आली व त्यामुळे माझा घुस्मटमार व्हायला लागला. 27 जानेवारी रोजी आपले सर्व पाठीराखे, कुटुंबातील सदस्य, मित्र व असंख्य चाहत्यानी बाहेरील पक्षाला गोव्यात (Goa) का आणता? त्यामुळे मतांचे विभाजन होईल. त्यामुळे परत एकदा विचार करुन तृणमेूल पक्ष सोडून कॉंग्रेस पक्षात सामिल होण्याचा सल्ला दिला असे रेजनाल्डने सांगितले.

Aleixo Reginald Lawrence
Goa Assembly Election: केजरीवाल आणि चिदंबरम यांचा ट्विटवॉर..

जेव्हा मी प्रचारासाठी कुडतरीत मतदारांशी संपर्क साधला तेव्हा त्यानीही आपल्याला काँग्रेस उमेदवारीवर निवडणूक लढवावी असा आग्रह धरला असेही रेजिनाल्ड यानी सांगितले. गोव्यासाठी केवळ कॉंग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचेही रेजिनाल्ड म्हणाला. मी लोकांच्या समस्या, त्यांचे प्रश्र्न विधानसभेत व विधानसभेबाहेर मांडत ज्या अपेक्षा बाळगुन मी तृणमूल पक्षात प्रवेश केला होता त्याचा केवळ 27 दिवसात अपेक्षाभंग झाला असेही रेजिनाल्ड म्हणाले. मी लवकरच कॉंग्रेसच्या नेत्यांशी या संबंधी बोलणी करणार असुन दोन दिवसात काय ते निश्र्चित होईल असे रेजिनाल्डने सांगितले.

कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपाचे माजी आमदार मायकल लोबो (Michael Lobo) यानी आपल्याशी संपर्क साधून त्यानीही कॉंग्रेस प्रवेश करण्याचा सल्ला दिली व त्यासाठी सहकार्य करण्याचेही आश्र्वासन दिल्याचे रेजिनाल्ड यांनी एका प्रश्र्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com