Goa Election: विजयाची डबल हॅट्‌ट्रिक साधणार

बाबू कवळेकर : भाजपमध्‍ये आल्‍यानंतर कार्यकर्त्यांची संख्‍या दुप्‍पट
Babu Kavlekar
Babu KavlekarDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: काँग्रेसमध्ये असतानाचे आपले जुने कार्यकर्ते आणि आता भाजपमध्‍ये दाखल झाल्यानंतर मिळालेले मूळ भाजप कार्यकर्ते हे सर्वजण आपल्या विजयासाठी आपल्याबरोबर मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. तसेच ही आपली सहावी विधानसभा निवडणूक (Assembly elections) आहे. त्‍यामुळे विजयाच्‍या डबल हॅट्‌ट्रिकचा आपला प्रयत्न असेल. सध्याची स्थिती पाहता आपला विजयरथ कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वास उपमुख्‍यमंत्री तथा केपे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांनी ‘गोमन्‍तक’ला दिलेल्‍या मुलाखतीत व्‍यक्त केला.

Babu Kavlekar
Goa: कृषीप्रधान राज्य बनविण्याचे सरकारचे ध्येय

या विधानसभा निवडणुकीत आपल्यासमोर कोणती आव्हाने आहेत?

मला तशी मोठी अशी आव्हाने कोणतीही नाहीत. ही जरी माझ्यासाठी पहिली भाजप चिन्हावरील निवडणूक असली तरी यापूर्वी झालेल्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीत आमच्या उमेदवारांनी चांगले यश मिळवत सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपचा उमेदवार म्हणून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवित असलो तरी मोठा फरक पडणार नाही. ही माझी एकूण सहावी विधानसभा निवडणूक असून डबल हॅट्‌ट्रिकचा प्रयत्न असेल. पूर्वीपेक्षाही यावेळी मला दुप्पट पाठिंबा मिळत आहे. लोक विविध ठिकाणी मोठ्या सख्येने माझ्या प्रचारात सहभागी होत आहेत. फातर्पा, मोरपिर्ला, बार्से, खोला, अवेडे या पंचायत तसेच केपे पालिका क्षेत्रात मला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर तुमची ही पहिली विधानसभा निवडणूक. त्याबद्दल काय सांगाल?

त्यात काही विशेष नाही. कारण भाजपमध्‍ये आल्यानंतर आम्ही जिल्हा पंचायत निवडणुकीत चार जागा मिळवल्या आहेत. केपेच्या मतदारांबरोबर माझी नाळ कित्येक वर्षांपासून जुळलेली आहे. केपेकरांचे प्रेम मला यावेळीही नक्कीच मिळेल.

Babu Kavlekar
Goa Election: कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज गोवा दौऱ्यावर

तुमच्या प्रभावाखालील पंचायती तोडण्याचा प्रयत्न झाला असे म्‍हणतात, त्‍याबद्दल तुमचे काय म्‍हणणे?

आमच्या कार्यकर्त्यांची टीम पूर्वीप्रमाणेच आहे. कार्यकर्त्यांची संख्या दुप्पट झाली आहे. माझ्याबरोबर गेली 22-23 वर्षे काम करणार माझे जुने कार्यकर्ते आजही माझ्यासोबत आहेत. तर आता मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांची त्यात भर पडली आहे. हे सर्वजण मिळून एकसंधपणे माझ्यासाठी काम करत आहेत.

भाजप प्रवेशाआधी विरोधात असल्याने मतदारसंघातील विकास रखडला होता. मात्र सत्तेत आल्यानंतर अनेक कामांना हात घातला आहे. विशेषतः कृषी क्षेत्रात विविध योजना राबविल्या आहेत. मतदारसंघात बेरोजगारीची समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी पुन्हा निवडून आल्यानंतर खाजगी उद्योगांचीही मदत घेणार आहे.

कृषी क्षेत्रात कोणती कामे केली आहेत?

या क्षेत्रात आम्ही काही ठोस पावले उचलली आहेत. चांगल्या योजना सादर केल्या आहेत. शेतकऱ्यांना विचारात घेऊन या योजना आखण्यात आल्या आहेत. सामुदायिक शेती, शेतकऱ्यांना सबसिडी याद्वारे राज्याला पुन्हा एकदा कृषीप्रधान बनविण्याचा हेतू आहे. पूर्वी गोवा कृषीप्रधान राज्य होते. कालांतराने शेतीकडे दुर्लक्ष झाले. परंतु आता लोकांनी पुन्हा शेतीकडे यावे यासाठी आमचा प्रयत्‍न असेल.

Babu Kavlekar
'उत्तर गोव्याचा विकास झाला तर दक्षिण गोवाही पुढे जाईल'

केपे मंतदारसंघात पुढील कामे काय असणार ?

विकास करण्यासाठीच मी 22 वर्षांनंतर पक्षांतर केले. भाजप हा असा पक्ष आहे जो पूर्णपणे देशाचा विकास घडविण्यासाठी काम करतो. ‘आत्मनिर्भर भारत’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न हे त्याचेच द्योतक आहे. असे असताना मला मिळालेल्या 2.5 वर्षांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारमुळे भरपूर विकासकामे झाली. केपेचा मास्टर प्लान बनवून विकास घडविण्याचे काम चालू आहे.

Babu Kavlekar
नरेंद्र मोदी आणि गोवा कनेक्शन; 2002 ते 2022.. 20 वर्षात काय बदललं?

केपेत नूतन बसस्थानक, जुन्या रस्त्यांचा विस्तार, गरजेचे रस्ते बांधणे, पिण्याच्या पाण्याच्या ३५ कोटी खर्चून उभारलेला प्रकल्प, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नूतन कृषी घर तर केपे शहराचा पार्किंगचा विषय सोडविण्यासाठी नगरपालिका ते दियांव राजवाडा असा 15 मीटर रुंद आणि 200 मीटर लांबीचा चालू झालेला प्रकल्प यांसारखे अनेक विषय मी हाताळले. बरेच प्रकल्प चालू असून, निवडून आल्यानंतर मी ते पूर्ण करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com