गुळेली: काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत गुळेली पंचायत क्षेत्रात एकूण चार बुथ मिळून 86 टक्के मतदान झाले आहे. बुथवार टक्के वारी पाहिली तर वाळपई मतदार संघात मुरमुणे बुथ वर सर्वात जास्त 91टक्के मतदान झाले. सदर बुध गुळेली पंचायत क्षेत्रात येतो.या बुथवरील वाढीव मतदानाचा नेमका कुणाला फायदा हे 10 मार्चला कळेलच. (Guleli Panchayat Constituency)
मागच्या जिल्हा पंचायत निवडणूक ह्या बुधवार कांग्रेस ने आघाडी घेतली होती सदर बुध हा मेळावली आयआयटी विभागात येत असल्याने यंदाही जिल्हा पंचायत निवडणूकीची पुनरावृत्ती होते की विद्यमान आमदार विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांना त्याचा यंदा फायदा होतो ते 10 मार्चला कळेल या बुथवर मुरमुणे व पैकुळ विभाग येतो.गुळेली पंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान पंच अस्मिता मेळेकर व अपूर्वा च्यारी यांचे हे दोन्ही वार्ड आहेत या बुथवर एकूण 591 मतदान झाले. या बुरावरील एकूण 647 मतदारापैकी 591 मतदारांनी मतदानाया हक्क बजावला.
मेळावली भागात येणारा दुसरा बुध शेळ मेळावली बुथ. यावर 86 टक्के मतदान झाले. एकूण 690 मतदारांपैकी 600 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील जिल्हा पंचायत निवडणूकीत याही बुथवर काँग्रेसने आघाडी मिळविली होती. आता या निवडणूकीत या मतांचा नेमका कुणाला फायदा होणार ते पहावे लागेल .या बुथवर मैंगीणे, शेळ मेळावली व धड़ा हे गाव येतात सदर भागातून आयआयटीला प्रखर विरोध झाला होता.
गुळेली (Guleli) पंचायत क्षेत्रातील अन्य बुथ गुळेली .येथील बुधवर 725 मतदारांपैकी 574 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या बुथवर एकूण 79 टक्के झाले. जिल्हा पंचायत निवडणूकीत या बुधवार भाजपला आघाडी मिळाली होती यंदाही ती कायम रहाणार अशी चिन्हे दिसत आहेत.गुळेली व कणकिरे असे दोन वार्ड या बुथशी सलग्न आहे.
गुळेली पंचायत क्षेत्रातील पुढील बुथ धामसे असून एकूण 466 मतदारांपैकी 415 जणांनी मतदानांचा हक्क बजावला.या बुथवर एकूण 89 टक्के मतदान झाले. मागच्या जिल्हापंचायत निवडणूकीत भाजपाला येथे आघाडी मिळाली होती ती कायम राहणार असल्याचे संकेत मिळतात.
गुळेली पंचायत क्षेत्राच्या एकूण चार बुथचा विचार केला तर मागच्या जिल्हा पंचायत निवडणूकीत दोन बुथ भाजपा बरोबर व दोन बुथ काँग्रेस (Congress) बरोबर होते. यंदा मात्र भाजपा, काँग्रेस, आप, आरजीपी, मगो, शिवसेना, अपक्ष असे उमेदवार असल्याने मुळेली पंचायत आपला कौल कुणाच्या बाजूने देतात याकडे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.