मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या शपथविधी समारंभासाठी गोवा सरकारने श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मोठा समारंभ आयोजित केला होता. या समारंभ राज्यभरातून तसेच देशभरातून अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. हा सोहळा 28 मार्च रोजी पार पडला होता. या समारंभास तब्बल 5.5 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. (5.5 crore spent for the swearing in ceremony of Pramod Sawant government )
माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जास दिलेल्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे. या समारंभास राज्याच्या तिजोरीतून तब्बल 5.5 कोटी रुपये खर्च केले, अशी माहिती यासंदर्भातील उत्तरातून समोर आली आहे. याबाबत मिळालेल्या कागदपत्रांनुसार ज्या कंपनीला शपथविधी समारंभाचे व्यवस्थापन करण्यासाठीचे नियोजन देण्यात आले होते. त्यांनी सरकारला 5,59,25,805 रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार, बिल केलेल्या ३२ वस्तूंपैकी स्टेज सजावटीची किंमत रु. 1.87 कोटी, विशेष अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ५०० खुर्च्या रु. 3 लाख तर इतर महत्त्वाच्या व्यक्तींसाठी साठी 3500 खुर्च्या रु. 8.75 लाख, 10,000 व्यक्तींसाठी दुपारचे जेवण रु. 57.50 लाख तर 500 अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी साठी स्पेशल जेवण रु. 4.80 लाख
तसेच 75 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी साठी विशेष बुफे रु. 5.66 लाख, तर कार्यक्रमस्थळी उभारलेल्या दोन कमानी रु. 16 लाख, ध्वनी प्रणाली रु. 14 लाख, तीन रेड कार्पेट रु. 8.25 लाख, जनतेसाठी पंडाल उभारणी रु. खांबावर 19 लाख आणि 2400 कट आऊट लावले रु. 68.40 लाख. तसेच 5.5 कोटी रुपयांच्या रकमेमध्ये बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमचे भाडे शुल्क प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींवर झालेला खर्च समाविष्ट नसल्याचं ही स्पष्ट करण्यात आलं आहे.
या शपथविधी समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. तसेच हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, आसामचे मुख्यमंत्री हेमंत शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल, कर्नाटकचे मुख्यमंत्री डॉ. स्वराज मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी, मणिपूरचे वीरेंद्र सिंह आदि भाजप नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.