15,716 सरकारी कर्मचारी करणार टपालाने मतदान

कामानिमित्त गोव्याबाहेर असलेल्या 290 जणांनी ऑनलाईन मतदानासाठी (ईटीपीबीएस) अर्ज केले आहेत व त्यांना हे मतदान करून 10 मार्च मतमोजणी सुरू होण्यापूर्वी पाठवायचे आहेत.
15,716 government employees will cast their votes by post for goa assembly election 2022
15,716 government employees will cast their votes by post for goa assembly election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील विधानसभेसाठी मतदान झाले असले तरी मतदानाच्या दिवशी सेवा बजावणाऱ्या 15,716 सरकारी कर्मचाऱ्यांना टपालाने मत पाठवण्याची मुभा मतमोजणी सुरू होण्यापूर्वीपर्यंत आहे. त्यामुळे सध्याच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊन ती 81 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी दिली. (15,716 government employees will cast their votes by post for goa assembly election 2022)

15,716 government employees will cast their votes by post for goa assembly election 2022
मडगाव कार्निव्हलमध्ये यंदा ‘गोव्याची परंपरा’

मतदान केंद्रावरील कर्मचारी, कायदा व सुव्यवस्था हाताळणारे पोलिस कर्मचारी (Goa Police), तालुकावार निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कार्यालयामधील कर्मचारी तसेच निवडणूक कार्यालयातील कर्मचारी याना मतदानाच्या दिवशी मतदान करता आलेले नाही. त्या सर्वांना त्यांना असलेल्या मतदारसंघातील उमेदवारांची मतपत्रिका देण्यात आली आहे. त्यांनी ती टपालाने संबंधित मतदारसंघ (Constituency) असलेल्या निर्वाचन अधिकाऱ्यांकडे किंवा प्रत्यक्षात त्या संबंधित निर्वाचन अधिकाऱ्याच्या कार्यालयात ठेवण्यात आलेल्या मतदारसंघ पेटीत जमा करायची आहे. या मतपेट्या मतमोजणीच्या दिवशी उघडण्यात येणार आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

या निवडणुकीत कामानिमित्त गोव्याबाहेर (Goa) असलेल्या 290 जणांनी ऑनलाईन मतदानासाठी (ईटीपीबीएस) अर्ज केले आहेत व त्यांना हे मतदान करून 10 मार्च मतमोजणी सुरू होण्यापूर्वी पाठवायचे आहेत. त्यामुळे सध्या मतदान झालेल्यांमध्ये ही मते जमा होणार आहेत. याव्यतिरिक्त 80 वर्षे व त्यावरील 29797 ज्येष्ठ नागरिक व 9590 विकलांग मतदार आहेत. त्यांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची मते जमा केली आहेत.

राज्यात एकूण किती मतदान झाले आहे याची अधिकृत संख्या ही मतमोजणीवेळी टपाल मते जमेत धरल्यानंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com