Navratri 2025: नवरात्रीचा उपवास करत असाल, तर 'या' चुका चुकूनही करू नका; वाचा व्रताचे कठोर नियम

Navratri 2025 fasting rules: नवरात्रीचे व्रत अधिक प्रभावी होण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते, या दिवसांत काय करावे आणि काय टाळावे, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया
Navratri vrat rituals
Navratri vrat ritualsDainik Gomantak
Published on
Updated on

Navratri vrat rules and regulations: नवरात्रीच्या पावन दिवसांत माता दुर्गेच्या नऊ विविध रूपांची मनोभावे पूजा केली जाते. या काळात मातेची विधीवत आराधना केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. नवरात्रीचे व्रत अधिक प्रभावी होण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. या दिवसांत काय करावे आणि काय टाळावे, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

नवरात्रीत 'हे' नक्की करा

  • जमिनीवर झोपा: नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस बिछान्यावर झोपणे टाळावे. श्रद्धा आणि भक्तीभावाने व्रत करण्यासाठी जमिनीवर झोपणे अधिक योग्य मानले जाते.

  • सात्त्विक आहार घ्या: या नऊ दिवसांत केवळ शुद्ध आणि सात्त्विक (vegetarian) अन्नाचे सेवन करावे. कांदा, लसूण, मासे, मांसाहार, मद्य आणि जंक फूडसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन कटाक्षाने टाळावे.

Navratri vrat rituals
Shardiya Navratri 2025: घटस्थापना कधी आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी? जाणून घ्या संपूर्ण पूजा पद्धती
  • कुमारिका भोजन: नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एका लहान मुलीला जेवू घालणे किंवा तिला फलाहार देणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अष्टमी आणि नवमीच्या दिवशी नऊ कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत फलदायी मानले जाते.

  • स्त्रियांचा आदर करा: नवरात्रीत कोणत्याही महिलेचा, मग ती आई असो, बहीण, पत्नी किंवा इतर कोणीही, अनादर करू नये. सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर करू नका.

चुकूनही 'या' गोष्टी करू नका

  • केस आणि नखं कापू नका: नवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी या पवित्र दिवसांत केस आणि नखं कापणे टाळावे. असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते, अशी मान्यता आहे.

  • खोटे बोलू नका आणि वाद टाळा: नवरात्रीच्या काळात खोटे बोलू नये आणि कोणालाही शिवीगाळ करू नये. नेहमी खरे बोलावे आणि सर्वांशी आदराने वागावे. तसेच, वादविवाद आणि रागापासून शक्यतो दूर राहावे.

नवरात्रीच्या या नियमांचे पालन करून तुम्ही माता दुर्गेची आराधना अधिक भक्तिभावाने करू शकता.

(वर दिलेल्या माहितीची पुष्टी दैनिक गोमंतक करत नाही)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com