
भारतीय शास्त्रात भगवद्गीतेला भरपूर महत्व आहे. असं म्हणतात गीतेत जीवनाचं सार दडलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती, ती तिथी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी, जिला मोक्षदा एकादशी असं देखील म्हणतात. एकादशी ही भगवान विष्णूची उपासना करण्याचा दिवस आहे असं म्हणतात या दिवशी देवाची मनोभावे उपासना केल्याने जीवन आणि मरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. पुरणात मोक्षदा एकादशी बद्दल एक कथा सांगितली गेली आहे, ती काय हे जाणून घेऊया...
तर ही कथा सांगते की फारफार वर्षांपूर्वी गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करीत होता. राजा उत्तम कार्यकर्ता होता, प्रजेची काळजी घेऊन कार्यभार चालवणारा होता. एकदा रात्री राजाला भयंकर स्वप्नं पडतं, ज्यात त्याला त्याचे वडील नरकात दिसतात आणि ते राजाजवळ नरकातून माझी सुटका कर अशी विनवणी करत असतात.
हे स्वप्न पाहून राजा अस्वस्थ, घाबरतो होतो आणि सकाळी ब्राम्हणांची भेट घेतो आणि वडिलांना मोक्ष कसा मिळवून देऊ याचं उत्तर मागू लागतो. राज्याची अस्वस्थता पाहून ब्राम्हणांनी त्याला त्वरित पर्वत ऋषींकडे जायचा मार्ग सुचवला.
पर्वत ऋषी भूतकाळ आणि भविष्यकाळाचे जाणकार होते, त्यांनी राजची सगळी व्यथा ऐकून घेतली आणि त्याला त्याच्या वडिलांनी आधल्या जन्मात केलेल्या चुकीचा उलघडा करून दिला. राजच्या वडिलांनी आधल्या जन्मात एका स्त्रीला त्रास दिला असल्याने ते नरकात यातना भोगत होते. हे ऐकून राजा आणखीन दुखी झाला आणि उपायाची याचना करू लागला. पर्वत ऋषींनी देखील त्याला मार्गशीर्ष व्रताचा उपाय सुचवला. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने मोक्षदा एकादशीचे व्रत केले आणि सर्व पुण्य वडिलांच्या नावे रुजू करून टाकले, यामुळे त्याच्या वडिलांना मोक्ष मिळाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.