One day chaturthi celebration in Goa
गोवा: राज्यात सध्या नवरात्रीचे वातावरण सुरु आहे. ठिकठिकाणी देवीचा हा उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातोय. फोंडा आणि इतर तालुक्यांमध्ये मखरोत्सवाला उधाण आले आहे आणि अशातच काल गोव्यात अश्विन महिन्यातील गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. काही कारणास्तव ज्या कुटुंबांची भाद्रपद महिन्यातील चतुर्थी राहून जाते त्यांना या दिवशी चतुर्थी साजरी करण्याची आणखीन एक संधी मिळते.
शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ही चतुर्थी साजरी केली जाते. एक दिवसासाठी गणेशमूर्ती आणून तिची विधिवत पूजा होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी मूर्तीचे विसर्जन केले जाते. चतुर्थीचा हा उत्सव जरी एका दिवसाचा असला तरीही उत्साह आणि आनंद यात जराही तफावत जाणवत नाही.
मोदक, लाडू, करंज्या यांची गणपती समोर आरास मांडली जाते तर गोव्यात कैक वर्षांपासून जपलेल्या घुमट आरतीच्या गजरात हा एक दिवस आनंदाने साजरा केला जातो. चतुर्थी हा सण गोमंतकातील सर्वांसाठीच जिवाभावाचा आहे त्यामुळे काही अपरिहार्य कारणास्तव ( सुतक किंवा सुवेर) जेव्हा चतुर्थी साजरी करता येत नाही तेव्हा या पर्यायाची सोय केली गेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.