''बान तू सायबा'', भूतनाथाला रानातून परत आणण्यासाठी भाविक जमणार; पेडण्यात भरणार 'पुनव उत्सव'

Bhootnath Punav Utsav Pernem: श्री 'भगवती देवस्थाना'च्या या पारंपरिक उत्सवासाठी भाविकांचा मोठा सागर उसळणार आहे
bhootnath punav utsav
bhootnath punav utsavDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: गोव्यासह शेजारच्या राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेला पेडणे येथील दसरोत्सव, ज्याला 'पुनव' म्हणून ओळखले जाते, तो यंदा मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री 'भगवती देवस्थाना'च्या या पारंपरिक उत्सवासाठी भाविकांचा मोठा सागर उसळणार आहे.

आदिस्थान देवाचा मांगर येथे मध्यरात्रीपासून विधी

या उत्सवानिमित्त आदिस्थान देवाचा मांगर येथे मध्यरात्री १२ वाजल्यापासून धार्मिक विधींना सुरुवात होईल. येथे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना श्री रवळनाथ व भूतनाथ या दोन्ही देवांची तरंगे कौल देतील. त्यानंतर अंगात आलेल्या व्यक्तींवरील भुते काढण्याचा कार्यक्रम सुरू होतो, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. यानंतर दोन्ही तरंगे ढोल-ताशांच्या तालावर पुढे मार्गस्थ होतात.

bhootnath punav utsav
Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

'भूतनाथाचा हट्ट' आणि भाविकांची मनधरणी

या उत्सवाचा सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक भाग म्हणजे श्री भूतनाथ देवाचा हट्ट. दरवर्षीप्रमाणे यंदाही भूतनाथ 'एका रातीत-एका वातीत' मंदिर बांधून देण्याच्या हट्टापायी रागाने रानाच्या दिशेने धावत सुटेल. त्यावेळी भाविक त्याची समजूत काढण्यासाठी मोठ्याने 'बान तू सायबा, बान तू सायबा' अशी त्याची मनधरणी करतील.

भाविकांच्या विनंतीला मान देऊन भूतनाथ माघारी फिरतो. त्यानंतर ठरावीक समाजातील लोकांना कौल दिल्यावर श्री भूतनाथ व श्री रवळनाथाची तरंगे रवळनाथाच्या मंदिरात जाऊन स्थिरावतात. या उत्सवासाठी परिसरात विविध प्रकारची दुकाने आणि स्टॉल्स थाटण्यास सुरुवात झाली आहे.

पार्से-आगरवाडा येथे दर तिसऱ्या वर्षीचा विशेष सोहळा

दर तिसऱ्या वर्षी साजरी होणारी देवाची 'पुनव' यावर्षी ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी पार्से आणि आगरवाडा येथे साजरी होणार आहे.

पाहुणचार आणि स्वागत: पार्से येथील श्री भगवती देवीची तरंगे सोमवारी रात्री ११ वाजता आगरवाडा येथील श्री सातेरी देवस्थानात पाहुणचारासाठी निघतील आणि ७ रोजी पहाटे पोचतील. मंगळवारी दिवसभर श्री सातेरी मंदिरात पाहुणचार घेतल्यानंतर त्या पार्सेकडे परतण्यास निघतील.

सजवलेले मार्ग: या दोन्ही गावांमधील रस्ते विद्युत रोषणाई, पताका आणि रांगोळ्यांनी सजवले जातात. भाविक रात्रभर जागून देवी भगवतीच्या आगमनाची वाट पाहतात.

पारंपरिक विधी: वाटेत देवी भगवतीची खण-नारळाने ओटी भरली जाते. तसेच देवी भगवतीचे महाजन आणि मानकरी यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाते. देवी सातेरीच्या मंदिरात देवी भगवतीचा कलश पूजेला ठेवला जातो.

सामूहिक कौल सोहळा: सायंकाळी श्री देवी सातेरीच्या प्रांगणामध्ये भाविकांना एका खास जागेवर उभे राहून कौल दिला जातो. त्यानंतर तरंगे माघारी फिरतात. बुधवारी पहाटे ४ ते ५.३० या वेळेत पार्से येथील भगवती मंदिराच्या प्रांगणात सर्व भाविकांना कौल दिल्यावर या 'पुनवे'ची सांगता होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com