पिझ्झा-बर्गरसोबत मिळतय 'डिटर्जंट्स फ्रि'...!

संशोधकांच्या मते, यामध्ये Phthalate या रसायनाचा वापर केला जातो. ही रसायने सौंदर्यप्रसाधने, विनाइल फ्लोअरिंग, डिटर्जंट्स (Detergents), डिस्पोजेबल हातमोजे, वायर कव्हर यांसारख्या उत्पादनांमध्ये वर्षानुवर्षे केला जात आहे.
पिझ्झा-बर्गर (Pizza-burgers) आवडत असेल तर ही बातमी एकदातरी नक्की वाचा.
पिझ्झा-बर्गर (Pizza-burgers) आवडत असेल तर ही बातमी एकदातरी नक्की वाचा. Dainik Gomantak
Published on
Updated on

पिझ्झा-बर्गर (Pizza-burgers) आवडत असेल तर ही बातमी एकदातरी नक्की वाचा. मॅकडोनाल्ड (McDonald's), बर्गर किंग (Burger King), डोमिनोज (Domino's) किंवा पिझ्झा हट (Pizza Hut) आउटलेट्समध्ये मिळणाऱ्या जंक फूडमध्ये डिटर्जंट्समध्ये (Detergents) वापरलेली रसायने मिसळली जातात, अशी धक्कादायक माहिती एका नवीन संशोधनातून समोर आली आहे. हा थेट तुमच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी (Washington University), साउथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (Southwest Research Institute) (सॅन अँटोनियो, टेक्सास), बोस्टन युनिव्हर्सिटी (Boston University) आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी (Harvard University) यांच्या संशोधनातून हे समोर आले आहे. हा अभ्यास जर्नल ऑफ एक्सपोजर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटल एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.

पिझ्झा-बर्गर (Pizza-burgers) आवडत असेल तर ही बातमी एकदातरी नक्की वाचा.
आता बिटकॉइनवर खरेदी करा पिझ्झा आणि कॉफी

मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट, डोमिनोज, टॅको बेल आणि चिपोटल या प्रसिद्ध फूड चेनमध्ये सापडलेल्या जंक फूडमध्ये प्लास्टिक मऊ करण्यासाठी वापरले जाणारे रसायन आढळले आहे.

या रसायनमिश्रित अन्नामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. संशोधकांनी या आऊटलेट्समधील हॅम्बर्गर, फ्राईज, चिकन नगेट्स, चिकन बरिटो आणि चीज पिझ्झाच्या 64 अन्न नमुन्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना असे आढळले की त्यामध्ये 80% पेक्षा जास्त पदार्थांमध्ये DnBP नावाचे phthalate असते आणि 70% phthalate मध्ये DEHP असते. ही दोन्ही रसायने आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

संशोधकांच्या मते, Phthalate या रसायनाचा वापर सौंदर्यप्रसाधने, विनाइल फ्लोअरिंग, डिटर्जंट्स, डिस्पोजेबल हातमोजे, वायर कव्हर यांसारख्या उत्पादनांमध्ये वर्षानुवर्षे केला जात आहे. हे रसायन प्लास्टिकला मऊ आणि वाकण्यायोग्य बनविण्यास मदत करते. जेणेकरून उत्पादनाच्या आवश्यकतेनुसार ते तयार केले जाऊ शकते.

पिझ्झा-बर्गर (Pizza-burgers) आवडत असेल तर ही बातमी एकदातरी नक्की वाचा.
Afghanistanचे मंत्री जर्मनीत विकत आहेत पिझ्झा

या रसायनांमुळे मुलांमध्ये अस्थमा, मेंदूच्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय ते एखाद्या व्यक्तीच्या प्रजनन व्यवस्थेवरही परिणाम करू शकतात. बुरिटो आणि चीजबर्गर यांसारख्या मांस-समृद्ध पदार्थांमध्ये रसायनांची पातळी जास्त असते, तर चीज पिझ्झामध्ये ती सर्वात कमी असते.

संशोधन सहयोगी लारिया एडवर्ड्स यांनी सांगितले की, हे सर्व नमुने एकाच शहरातील आहेत. याचे विश्लेषण विविध प्रकारच्या रेस्टॉरंट्सवर केंद्रित नाही. त्याच वेळी, अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ते अभ्यासाचे पुनरावलोकन करतील.

अन्न आणि औषध प्रशासनाने वॉशिंग्टन पोस्टला एका निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ते या अभ्यासाचे पुनरावलोकन करतील. एफडीएच्या प्रवक्त्याने सांगितले की, "एफडीएकडे उच्च सुरक्षा मानके असताना, नवीन वैज्ञानिक माहिती उपलब्ध झाल्यामुळे, आम्ही आमच्या सुरक्षिततेच्या मूल्यांकनाचे पुनर्मूल्यांकन करणार आहोत. अधिकृत वापरामुळे कोणतीही हानी होणार नाही याची खात्री आहे. संशोधकांनी सांगितले की, या पर्यायी प्लास्टिसायझर्सचे संपूर्ण आरोग्यावरील परिणाम अद्याप ज्ञात नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com