

Yemen 19 Indian Sailors Rescued Safe: पश्चिम आशियातील युद्धाचे ढग आणि प्रचंड तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी अत्यंत दिलासादायक आणि समाधानाची बातमी समोर आली. येमेनमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून अडकलेल्या सर्व 19 भारतीय खलाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली. येमेनमधील (Yemen) भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रभावी मुत्सद्देगिरीमुळे हे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक 'रेस्क्यू ऑपरेशन' यशस्वीरीत्या पार पडले.
दूतावासाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सुटका करण्यात आलेले सर्व 19 भारतीय नागरिक पूर्णपणे सुरक्षित आणि ठणठणीत असून, ते आता आपापल्या मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत.
भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर या मोहिमेची माहिती शेअर करताना सांगितले की, हे सर्व नाविक येमेनमधील हुदैदाह बंदरावर आणि राजधानी सना शहरात गेल्या 14 दिवसांपासून अडकून पडले होते. पश्चिम आशियातील स्थानिक परिस्थिती अत्यंत संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीत भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी अत्यंत धैर्याने आणि गुप्त रणनीतीने काम करत स्थानिक प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांच्या मदतीने या सर्व 19 जणांना सुरक्षित बाहेर काढले.
दूतावासाने आपल्या निवेदनात या संपूर्ण बचाव कार्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व स्थानिक घटकांचे, प्रशासनाचे आणि संस्थांचे मनापासून आभार मानले. नागरिकांची कोणतीही जीवितहानी न होता त्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारताने पुन्हा एकदा आपले राजनैतिक सामर्थ्य सिद्ध केले. या मोहिमेमुळे येमेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला असून, संपूर्ण देशातून भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक केले जात आहे. लवकरच हे सर्व नाविक मायदेशी पोहोचून आपल्या कुटुंबाशी भेट घेणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.