WWE: रेसलमेनिया की ड्रीम मॅच? ट्रिपल एच करणार मोठी घोषणा, रॉक–सीना चाहत्यांच्या आशा शिगेला

Triple H Big Announcement By WWE: ट्रिपल एचनं सोशल मीडियावरून चाहत्यांना थेट संबोधित करताना आज म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी एका घोषणेचे संकेत दिले आहेत.
Triple H, The Rock, John Cena
Triple H, The Rock, John CenaDainik Gomantak
Published on
Updated on

WWE शी संबंधित एक मोठा अपडेट समोर येत आहे. WWE चे चीफ कंटेंट ऑफिसर ट्रिपल एचनं सोशल मीडियावरून चाहत्यांना थेट संबोधित करताना आज म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी एका घोषणेचे संकेत दिले आहेत. भारतीय वेळेनुसार ही घोषणा आज रात्री 12:30 वाजता लाईव्ह प्रसारित केली जाणार आहे. या घोषणेमुळं WWE चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना प्रचंड उधाण आलं आहे.

रिपोर्ट्सच्या आधारावर असं मानलं जात आहे की WWE आपला सर्वात मोठा वार्षिक स्पर्धा रेसलमेनिया प्रथमच उत्तर अमेरिकेबाहेर आयोजित करण्याची घोषणा करू शकते. चर्चेत असलेला अंदाज म्हणजेच 2027 मधील रेसलमेनिया 43 सौदी अरेबियामध्ये होण्याची शक्यता आहे. या विशेष कार्यक्रमाचं नाव देखील “सौदीमेनिया” ठेवलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे.

जर हे खरं ठरलं, तर WWEच्या इतिहासात हा एक प्रचंड बदल ठरेल. दशकानुदशके अमेरिकेत होणारा हा मेगा इव्हेंट परदेशात नेण्याचा निर्णय काही चाहत्यांना अजिबात रुचणार नाही, तर काहींना तो एक नवा अध्याय वाटेल.

दिग्गज स्टार्स राहणार उपस्थित

या घोषणेसाठी WWE चे अनेक नामांकित सुपरस्टार्स उपस्थित राहणार असल्याचं वृत्त आहे. यात ट्रिपल एच, द अंडरटेकर, शॉन मायकेल्स, सेथ रोलिन्स, लोगन पॉल, बियांका बेलाअर, लिव्ह मॉर्गन, स्टेफनी वेकर आणि शार्लोट फ्लेअर या दिग्गजांची नावं समाविष्ट आहेत. इतक्या मोठ्या स्टार्सची उपस्थिती स्पष्ट दाखवते की ही घोषणा नेहमीसारखी साधी न राहता WWE च्या भविष्यासाठी गेमचेंजर असणार आहे.

ट्रिपल एचची सोशल मीडिया पोस्ट

ट्रिपल एचनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे, "मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही गेम बदलू, आणि आम्ही आता सुरुवात करत आहोत."

या विधानावरून असं दिसून येतं की WWE मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

द रॉक विरुद्ध जॉन सीना सामन्याचीही चर्चा

मात्र रेसलमेनियाच्या सौदी अरेबियाला जाण्याच्या चर्चेबरोबरच अजून एक मोठा अंदाज वर्तवला जात आहे. काही चाहत्यांच्या मते, ही घोषणा द रॉक आणि जॉन सीना यांच्यातील बहुचर्चित सामन्याबाबत असू शकते. जर हा सामना जाहीर झाला, तर तो वर्षातील सर्वात मोठा आकर्षण ठरेल यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com