WWE Fight In Moving Train: वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) रोमांचक कुस्ती सामने आयोजित करते, जे केवळ प्रेक्षकांना आकर्षित करत नाहीत तर मंत्रमुग्ध देखील करतात.
अलीकडेच, जपानमधील दोन कुस्तीपटूंनी हाय-स्पीड बुलेट ट्रेनमध्ये कुस्ती करुन त्यांची लढत एका नव्या उंचीवर नेली, प्रवाशांनाही खूप आनंद झाला.
WWE-स्टाइलचा हा सामना टोकियो-आधारित DDT प्रो-रेसलिंगने आयोजित केला होता आणि 75 प्रवाशांनी भरलेल्या ट्रेन कारमध्ये झाला.
Minoru Suzuki आणि Sanshiro Takagi यांच्यातील लढतीची तिकिटे अवघ्या 30 मिनिटांत विकली गेली.
टोकियो ते नागोया या शिंकानसेन बुलेट ट्रेनच्या प्रवासादरम्यान ही रोमांचक कुस्ती झाली. सोशल मीडियावर (Social Media) या कुस्तीचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये, मिस्टर सुझुकी आणि मिस्टर टाकगी यांच्यात हा कुस्तीचा सामना रंगला होता. दोघांनीही शानदार प्रदर्शन केले. प्रवाशांनी या कुस्तीचा मनसोक्त आनंद लुटला.
विशेष म्हणजे, अनेकांनी स्मार्टफोनमध्ये रेकॉर्ड देखील केले. हा व्हिडीओ व्हायरल होताच यूजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत.
एका यूजरने म्हटले की, ‘दिल्ली मेट्रो ट्रेनपासून प्रेरित’ अशी खिल्ली उडवली. तर दुसर्याने म्हटले की, "देवा, माणसांना काय झाले आहे, मनुष्य किती बदलला आहे."
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, दोन जागतिक कुस्तीपटू चालत्या बुलेट ट्रेनमध्ये कसे प्रवास करत आहेत हे दिसत आहे. सोशल मीडियावर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. एका
यूजरने लिहिले, "काहीही झाले तरी... आमच्या दिल्ली मेट्रोशी कोणीही बरोबरी करु शकत नाही!" दुसऱ्याने लिहिले, ‘प्रवाशांसाठी चांगले मनोरंजन आहे.’ तिसऱ्याने लिहिले, ‘ही लढत कंटाळवाणी वाटते. तर चौथ्याने लिहिले की, "आत बसलेले प्रवासी (Passengers) भांडणावर हसत आहेत."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.