ब्रिटनमधील मँचेस्टर विमानतळावरून टेक ऑफ करणाऱ्या विमानात प्रवास करणाऱ्या एका महिलेने असा गोंधळ घातला की, ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाले.
पायलटला मारली चापट
वृत्तानुसार, जेट 2 एअरलाइन्सच्या महिलेने पायलटच्या (Pilot) कानशिलात मारून आपत्कालीन लँडिंग (landing) केले. घाबरलेल्या एअर होस्टेस सोबत देखील गैरवर्तन केले. यामुळे या महिलेला मोठा दंड ठोठावण्यात आला आणि आजीवन हवाई प्रवास (air travel) करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पाच लाखांचा दंड
जेट 2 च्या प्रवक्त्याने सांगितले की कॅथरीन बुशने "आक्रमक, अपमानास्पद आणि धोकादायक वर्तन" केले. व्हायरल फुटेजमध्ये, एक संतप्त महिला मँचेस्टर विमानतळावरून तुर्कीच्या अंतल्याकडे उड्डाण करताना दिसत आहे. आता हिंसक हल्ल्याप्रकरणी तिच्यावर 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
वेस्ट यॉर्कशायरचे बुश, फ्लाइट दरम्यान किंचाळत असल्याचे चित्रित करण्यात आले. त्यामुळे उड्डाणानंतर दोन तासांनी विमानाला व्हिएन्नाच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागले. संतप्त महिलेच्या या वागण्यामुळे विमानातील प्रवाशांना तासाभराहून अधिक उशीर झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.